Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मंडप, डेकोरेशन, इव्हेंट चालकांचे राज ठाकरेंना साकडे

मंडप, डेकोरेशन, इव्हेंट चालकांचे राज ठाकरेंना साकडे

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे सर्व सांस्कृतीक, धार्मिक, संमारंभावर बंदी आल्यामुळे मंडप व्यावसायिक, लाईट व फ्लॉवर डेकोरेटर्स अडचणीत आले आहेत. कोरोनामुळे जिल्हयातील इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रिला देखील मोठा फटका असला आहे. कोरोनामुळे लग्नसराईचा हंगाम तर हातचा गेला मात्र आता दिवाळीनंतर सुरू होणार्‍या विवाह सोहळयांना परवानगी देण्यात यावी तसेच यावर आधारित मंडप, डेकोरेटर्स, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनाही परवानगी देण्यात यावी याकरीता नाशिक जिल्हयातील मंडप, डेकोरेशन आणि इव्हेंट चालकांनी मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

यावेळी व्यावसायिकांनी ठाकरे यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. नाशिकमध्ये मंडप व्यवसायापासून ते बँडपर्यंत सुमारे ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध होतो. कोरोनामुळे सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिक आणि त्यांना पूरक मंडप डेकोरेटर्सवरील कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. शुभकार्याच्या संयोेजनासाठी इव्हेंट इंडस्ट्रि निर्माण झाली. मंडपापासून ते बँडपर्यंत सर्व काही एकाच छताखाली मिळण्याची सोय झाल्याने नाशिकमध्येही ही इंडस्ट्रि मोठया प्रमाणावर वाढू लागली. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने शासनाने लॉकडाऊन केल्याने समारंभ थांबले. त्यामुळे मंडप, डेकोरेशन आणि इव्हेंट मॅनेमेंट कंपन्याही अडचणीत आल्या. त्यामुळे या व्यावसायिकांची होरपळ कशी थांबेल याकडे आपण शासनाकडे आमच्या व्यथा मांडून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत शासनाशी तसेच स्थानिक प्रशासनाशी आपण चर्चा करू असे आश्वासन राज ठाकरे यांनी व्यावसायिकांना दिले. यावेळी मनसेचे गटनेते सलीम शेख , जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, शहर सचिव अंबादास आहिरे , असोसिएशनचे विनोदजी दर्याणी ,सुभाष नाईकवाडे , गणेश मटाले, दाऊद कादरी, कैलास गांगुर्डे आदि उपस्थित होते.

- Advertisement -

सध्या मंडप व्यावसायिक आणि त्यावर आधारित पुरक उद्योग जसे की, डेकोरेशन, इव्हेंट मॅनेमेंट कंपन्या, बँड व्यावसायिक अत्यंत अडचणीत सापडला आहे. लग्नसराई नजरेसमोर ठेवूनच चांगल्या बुकिंगही झाल्या होत्या परंतु कोरोनामुळे सर्व कामे रद्द होऊन घेतलेली रक्कमही परत देण्याची वेळ व्यावसायिकांवर आली त्यामुळे आता दिवाळीनंतर सुरू होणार्‍या लग्नसराईच्या काळात तरी या व्यावसायिकांना शासनाने दिलासा द्यावा याकरीता शासनाकडे आपल्या माध्यमातून शासनाकडे प्रश्न मांडावे याकरीता राज ठाकरे यांची आज भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
विनोद दर्याणी, मंडप असोसिएशन

- Advertisement -