घरमहाराष्ट्रनाशिकन्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू

न्यूमोकोकल लस रोखणार बालमृत्यू

Subscribe

आजपासून शहरात लसीकरण, न्यूमोनियाला प्रतिबंध

लहान मुलांमध्ये बॅक्टेरियल न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. त्यामुळे चिमुकल्यांना जीव देखील गमवावा लागू शकतो. या प्रकारे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी आता न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीचा सार्वत्रिक नियमित लसीकरण मोहिमेत समावेश करण्यात आला आहे. नाशिकमध्ये मंगळवार (दि.१३) पासून लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या आजारामुळे होणारे मृत्यू रोखण्यास मदत मिळणार आहे.

देशात एक हजार मुलांमागे ३४ मुले न्यूमोनिया मुळे मृत्यू पावतात. राज्यात त्याचे प्रमाण एक हजार मुलांमागे १९ आहे. न्यूमोकोकल हा एक संसर्गजन्य आजार असून, प्रामुख्याने वृध्द व्यक्ती व बालकांना तो होतो. हिप न्यूमोनिया आणि न्यूमोकोकल न्यूमोनियामुळे साधारणतः अर्भक आणि बालमृत्यू होतात. हे रोखण्यासाठी १३ जुलै पासून न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

तीन डोस दिले जाणार

या लसीकरण मोहीमेअंतर्गत दीड महिन्यांच्या नवजात शिशुला पहिला डोस दिला जाणार आहे. त्यानंतर साडेतीन महिन्यानंतर दुसरा आणि ९ महिन्यानंतर तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे.सदर लसीकरण हे दीड महिन्यांच्या नवजात बालकांपासून सुरुवात केली जाणार आहे.शहरातील सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर नियमित लसीकरण सत्रात ही लस दिली जाणार आहे. न्यूमोकोकल कॉन्जुगेट लसीकरणाच्या अनुषंगाने आरोग्य कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले गेले आहे.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकिय अधिकारी, महापालिका

- Advertisement -

काय आहे न्यूमोकोकल न्यूमोनिया ?

न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येउन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होउ शकतो. मुले बेशुध्द होउ शकतात व मृत्यू देखील होउ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -