घरताज्या घडामोडीग्रामस्थांची सतर्कता : रात्रीची माहेरी आलेली कोरोनाबाधिताची पत्नी ताब्यात

ग्रामस्थांची सतर्कता : रात्रीची माहेरी आलेली कोरोनाबाधिताची पत्नी ताब्यात

Subscribe

मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील एका खासगी डॉक्टरला कोरोना संसर्गाची लागण झाली असून त्यांची पत्नी सटाणा येथे माहेरी आल्या. ही बाब परिसरातील नागरिकांना समजताच त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन मालेगावला रवाना केले तर त्यांच्या आई-वडिलांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दाभाडी येथील एका खाजगी डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पत्नीचे माहेर सटाणा येथे असल्याने त्या रात्रीच्या वेळेस आईवडिलांकडे आल्या परिसरातील नागरिकांना चाहूल लागली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन त्या महिलेची आरोग्य तपासणी करून मालेगावला रवाना केले. त्यांच्या आईवडिलांना सटाण्यातच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सरकारी दवाखाना, पोलीस चौकी बसस्थानक या परिसरातील पोलिस गस्त वाढविण्यात आली आहे. अशाप्रकारे प्रत्येक नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचाली किंवा अनोळखी व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले आहे. आपला तालुका पूर्ण कोरोनामुक्त राहाण्यासाठी महसूल विभाग, पोलीस प्रशासन,आरोग्य विभाग,पालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. प्रत्येक नागरिकाने काळजी घेऊन स्वतःबरोबरच तालुक्याचे रक्षण करावे असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -