घरCORONA UPDATEविधान परिषदेसाठी भाजपमधून माजी मंत्री इच्छुक; नाथाभाऊ, पंकजा मुंडे अग्रस्थानी

विधान परिषदेसाठी भाजपमधून माजी मंत्री इच्छुक; नाथाभाऊ, पंकजा मुंडे अग्रस्थानी

Subscribe

विधान परिषदेवर आपल्याला जाता यावे म्हणून सर्वच पक्षात बरेच इच्छुक आहेत. पण सध्या भाजपमध्ये विधान परिषदेवर जाण्यासाठी एक दोन नव्हे तर पाच माजी मंत्री इच्छुक आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून सुरू असलेला राजकीय तिढा सुटला असून येत्या २१ मे रोजी राज्यात विधान परिषदेच्या ९ रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मात्र विधान परिषदेवर आपल्याला जाता यावे म्हणून सर्वच पक्षात बरेच इच्छुक आहेत. पण सध्या भाजपमध्ये विधान परिषदेवर जाण्यासाठी एक दोन नव्हे तर पाच माजी मंत्री इच्छुक आहेत. यामध्ये भाजप सरकारच्या काळात असलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, माजी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच आघडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आणि आता भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील हे इच्छुक आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून देव पाण्यात टाकून बसलेल्या भाजपच्या काही नेत्यांची नावे मात्र या माजी मंत्र्यामुळे मागे पडली आहेत.

असे आहे पक्षीय बलाबल

सध्या विधानसभेचे पक्षीय भाजपच्या तीन जागा सहज निवडून येऊ शकतात. मात्र चौथ्या जागेसाठी देखील मित्र पक्षाच्या मदतीने भाजप जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. जर ही जुळवाजुळव शक्य झाली तर भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात असे भाजपचे नेते सांगत आहेत. तर शिवसेना दोन, राष्ट्रवादी दोन आणि काँग्रेसला एक जागा सुटू शकते. दरम्यान भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होणार आहेत.

- Advertisement -

भाजपला परिषदेत हवा आक्रमक चेहरा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेत भाजपला आक्रमक नेत्याची गरज आहे. सरकारला कोंडीत पकडणारा चेहरा विधान परिषदेत देण्यासाठी भाजपने हालचाली देखील सुरू आहेत. त्यामुळे ज्याला प्रशासन आणि सरकार कळतं अशाच नेत्यांची वर्णी परिषदेसाठी लागू शकते. हा सर्व विचार केला एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मागील पाच वर्षे ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री म्हणून पंकजा मुंडे यांना कामाचा अनुभव असून, त्या ओबीसी आक्रमक नेत्या देखील आहेत. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे हे देखील आक्रमक नेते आहेत तसेच विरोधी बाकावर असताना या दोन्ही नेत्यांनी तेव्हाच्या आघाडी सरकारला सळोकी पळो करून सोडले होते.

मी विधान परिषद निवडणूक लढण्याबाबत पक्ष श्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली आहे. आता काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील.
– एकनाथ खडसे, भाजप नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -