घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्ररामरथ यात्रेच्या तयारीला वेग; प्रशासनाकडून पालखी मार्गाची पाहणी

रामरथ यात्रेच्या तयारीला वेग; प्रशासनाकडून पालखी मार्गाची पाहणी

Subscribe

नाशिक : राम रथ व गरुड रथ मिरवणूक मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व काँक्रिटीकरणाची कामे तातडीने करावीत, अनावश्यक खडी किंवा कच उचलून घ्यावी, उतार योग्य करावा, सुरू असलेली कामे शुक्रवार (दि.३१)पर्यंत पूर्ण करावीत, अशा मागण्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तांनी स्मार्ट सिटी व पालिका अधिकार्‍यांना केल्या.

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळख असलेल्या प्रभू श्रीराम व गरुड रथोत्सवाला २४७ वर्षांची परंपरा आहे. ही रथ मिरवणूक रामनवमीनंतर येणार्‍या कामदा एकादशीला रविवारी (दि. २) पंचवटी व सरकारवाडा परिसरातून काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२७) सकाळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या सुचनेनुसार पोलीस, स्मार्ट सिटी, महापालिका, विद्युत विभाग, दूरसंचार विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांसह श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त, रथोत्सव पदाधिकार्‍यांसमवेत रथोत्सव मार्गाची संयुक्त पाहणी केली. यावेळी श्री काळाराम मंदिर विश्वस्तांकडून पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान रस्त्यावर येणार्‍या अडीअडचणी जाणून घेतल्या. श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून रथोत्सव मार्गाच्या पाहणी दौर्‍याला पायी सुरुवात करण्यात आली.

- Advertisement -

रामरथ व गरूड मिरवणूक मार्गातील नागचौक, काट्याामारुती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाखालील भाग, नेहरू चौक, रोकडोबा तालीम, म्हसोबा पटांगण, गौरीपटांगण, सरकारवाडा, भांडीबाजार, कपुरतळा मैदान, कपालेश्वर येथील रस्त्याची पाहणी केली. तसेच, पोलीस अधिकार्‍यांनी राम रथ व गरूड रथांचीदेखील पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ, गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, साजन सोनवणे, दत्तात्रय पवार, पंचवटी विभागीय अधिकारी नरेंद्र शिंदे, स्मार्ट सिटीचे किसन कानडे, महावितरणचे अभियंता प्रदीप दाळू आदींसह विश्वस्त सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -