घरदेश-विदेशनामिबीयाहून भारतात आणलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू; आजारपणाचे कारण आले समोर

नामिबीयाहून भारतात आणलेल्या मादी चित्त्याचा मृत्यू; आजारपणाचे कारण आले समोर

Subscribe

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त काही महिन्यांपूर्वी भारतात आणलेल्या 8 चित्त्यांपैकी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. किडनीच्या आजारामुळे तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदींच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त साधारण 6 महिन्यांपूर्वी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. या चित्त्यांना मध्य प्रदेशमधील १० किलोमीटर पसरलेल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. या आठ चित्त्यांपैकी ‘साशा’ नावाच्या एका मादी चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. साडेचार वर्षांहून अधिक वय असणाऱ्या साशाचा मृत्यू किडनीच्या आजारामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

देशातून लुप्त पावलेल्या चित्त्यांच्या प्रजातीला पुन्हा एकदा नव्याने संजीवनी देत भारतात त्यांचा अधिवास पुन्हा तयार करण्याच्या हेतूने ‘प्रोजेक्ट चित्ता’ (Project Cheetah) ची सुरुवात करण्यात आली होती.

मध्य प्रदेशातील मुख्य वन संरक्षक जे.एस.चौहान यांनी साशाचा मृत्यू किडनीशी संबंधित आजारामुळे झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. निरीक्षण पथकाने 22 मार्चला ‘साशा’ काहीही हालचाल करत नसल्याचे पाहिले आणि क्वारंटाईन एनक्लोजरमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर साशाच्या रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. यातून तिला किडनीला संसर्ग झाल्याची माहिती समोर आली.

- Advertisement -

साशाच्या आजाराची माहिती मिळताच भारतीय वन्यजीव संस्थेच्या (डब्ल्यूआयआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नामिबीयातील चित्ता फाऊंडेशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना समजले की, 15 ऑगस्ट 2022 रोजी साशाच्या रक्तामध्ये क्रिएटिनिन स्तर 400 म्हणजेच किडनी निकामी होण्यास सुरूवात झाली होती, अशी माहिती मिळाली. म्हणजे साशाला भारतात आणण्याआधीच हा संसर्ग झाला होता.

भारतात 8 चित्त्यांना आणण्यामागचं म्हणजे 1947 मध्ये छत्तीसगढमधील कोरिया जिल्ह्यात देशातील शेवटच्या चित्त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे 1952 मध्ये ही प्रजाती देशातून नाहीशी झाल्याची घोषणा करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -