घरमहाराष्ट्रनाशिकमॉब लिचिंग विरोधात मुस्लिम बांधवांकडून निषेध

मॉब लिचिंग विरोधात मुस्लिम बांधवांकडून निषेध

Subscribe

जामा गौसिया मशीद : राष्ट्रीय एकात्मतेसाठी दुवा

देशभरातील मॉब लिचिंग आणि जमावाकडून होणारया घटनांच्या निषेधार्थ वडाळा गावातील जामा मशिदीत जुम्माच्या विशेष नमाज नंतर देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी तसेच देशाची कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍या समाजकंटकांचा निषेध नोंदविण्यासाठी छोटेखानी पद्धतीने निषेध सभा घेण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच झारखंड राज्यातील सराईकेला जिल्ह्यात तबरेज अन्सारी नावाच्या युवकाला चोरीच्या संशयावरून जमावाने एकटे गाठून गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट लाट उसळली असून ठिकाणी निषेध होत आहे. देशातील जमाव हल्ले थांबवा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे .या पार्श्वभूमीवर वडाळा गावातील गौसिया मशिदीच्या आवारात मशिदीचे इमाम मौलाना जुनेद आलम यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध सभा घेण्यात आली.

- Advertisement -

यावेळी देशातील जमाव हल्ले थांबवा अशी मागणी करण्यात आली. धर्मगुरूंच्या सुचनेप्रमाणे कुणीही घोषणाबाजी न करता केवळ मूक निषेध नोंदविला. जमाव हल्ले करून निष्पाप नागरिकांना मारणारयांचा सरकारने त्वरित बंदोबस्त करावा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी आणि या देशात कायदा व सलोका कायमस्वरूपी राखला जावा यासाठी राज्यकर्त्यांनी कठोर पावले उचलावी अशी मागणी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -