घरमहाराष्ट्रनाशिकअल्पवयीन भाचीवर सख्ख्या मामानेच केला बलात्कार

अल्पवयीन भाचीवर सख्ख्या मामानेच केला बलात्कार

Subscribe

नात्याला काळिमा फासल्याच्या घटनेचा सर्वच स्तरावरावरून केला जात आहे निषेध

तालुक्यातील उमराणे येथे अल्पवयीन भाचीवर सख्ख्या मामाने बलात्कार केल्याची घटना घडली. नात्याला काळिमा फासल्याच्या घटनेचा निषेध केला जात आहे.

संशयित मंगल उर्फ अमित घनश्याम जांझोड (वय ३५) हा आई व भाचीसह २३ ऑगस्टला रात्रीचे जेवण आटोपून त्यांच्या घरात झोपले होते. संशयिताने भाचीस चाकूचा धाक दाखवून, जीवे ठार मारण्याची धमकी देऊन घरातून बाहेर नेले व एका झाडाखाली बलात्कार केला. कुणाला सांगितल्यास तुला व आजीला मारून टाकण्याची धमकी दिली. सकाळी मुलीने घाबरून भोपाळ येथे वास्तव्यास वडिलांना घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर तिच्या वडिलांनी नाशिक पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. देवळा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला कुणकुण लागल्याने त्याने पलायन केले.

- Advertisement -

देवळा पोलिसांनी संशयित आरोपीला मनमाड येथील भाबडवस्तीतून पळून जाण्याच्या बेतात असताना उमराने पोलीस चौकीचे हवालदार मोठाभाऊ बच्छाव, योगेश क्षीरसागर यांनी ताब्यात घेतले. याबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी हा बलात्कारच्या गुन्ह्यातून १३ ऑगस्टलाच शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -