Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक मनसे सहकार सेना उपाध्यक्षपदी नाशिकचे रोहन देशपांडे

मनसे सहकार सेना उपाध्यक्षपदी नाशिकचे रोहन देशपांडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नियुक्तीपत्र सादर

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्या उपाध्यक्षपदी नाशिकचे तरुण कार्यकर्ते रोहन जयंत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार हे नियुक्तीपत्र मुंबईत झालेल्या कार्यक्रमात सरचिटणीस विजय जाधव यांनी सुपूर्द केले. महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तुंग झेप फाउंडेशनचे संस्थापक सदस्य असलेल्या रोहन देशपांडे यांचे पर्यावरण क्षेत्रातील कार्य नाशिककरांच्या नुकतेच समोर आहे. कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षांपासून ते व त्यांचे सहकारी नाशिकरोडच्या शिखरेवाडी परिसरात सातत्याने कार्यरत आहेत. ऑपरेशन हॉस्पिटल या अभियानाद्वारे त्यांनी गोरगरीब जनतेचे कोट्यवधी रुपये वाचवून दिले. त्यांच्या निवडीबद्दल माजी महापौर अशोक मुर्तडक, मनसे नेते डॉ. प्रदीप पवार, दिलीप दातीर, सलिम शेख, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार व सहकार्‍यांनी अभिनंदन केले. नियुक्ती झाल्यावर बोलताना रोहन देशपांडे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेची ध्येयधोरणे व कार्यक्रम मी माझ्या विभागात निष्ठापूर्वक राबवेन. त्यात कुचराई किंवा तडजोड होणार नाही याची ग्वाही देतो. हॅशटॅग चिपको चळवळीने आता व्यापक स्वरूप मिळवले असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -