घरमहाराष्ट्रनाशिकवाहन उद्योगातील मंदीमुळे ‘आरटीओ’चा महसूलही घटला

वाहन उद्योगातील मंदीमुळे ‘आरटीओ’चा महसूलही घटला

Subscribe

गतवर्षाच्या तुलनेत २६ कोटींचा फटका, पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना सवलतीचा वाहन उद्योगाला फटका

गत वर्षभरापासून वाहन विक्रीतील घट व जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडींमुळे वाहन उद्योग संकटात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयास (आरटीओ) एप्रिल ते जून २०१८ या तीन महिन्यांत ९७ कोटी ६१ लाख ५७ हजार रुपये महसूल मिळाला होता, तर यावर्षी 71 कोटी ५२ लाख महसूल मिळाला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २६ कोटी ९ लाख ५७ हजारांनी महसूलात घट झाल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना सवलत जाहीर केली आहे. ई-कारसाठी कर सवलतीसह देशभर चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. या सर्वांचा विपरित परिणाम वाहन उद्योगावर होतो आहे. वाहन विक्रीत घट झाल्याने वाहन उद्योगातील कंपन्यांना मंदीचा सामना करावा लागत आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात एप्रिल ते जून २०१९ या कालावधीत सर्व प्रकारच्या २६ हजार ५११ वाहनांची विक्रीची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक १९,५६७ दुुचाकींचा समावेश आहे. २०१८ मध्ये एप्रिल ते जून या कालावधीत २७ हजार १७१ वाहनांची विक्री झाली आहे. या दोन वर्षांमधील वाहन नोंदीची तुलना केली असता विक्रीत घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये एप्रिल ते जून महिन्यांत आरटीओकडे दुचाकी 18,293, स्कूटर 453, मोपेड 393, कार 3529, रिक्षा 497, स्कूल बस 130, ट्रक 1122, टॅ्रक्टर 1238 नोंदणी झाली आहे.

- Advertisement -

वर्षनिहाय वाहने व महसूल (एप्रिल ते जून)

वर्ष व वाहने (कंसात महसूल)

२०१८ – 27,171 (97,61,57,000)
२०१९ – 26,511 (71,52,00,000)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -