घरमहाराष्ट्रनाशिकशाळा मान्यता, पदोन्नती एकाच ठिकाणी:टीईटी घोटाळा

शाळा मान्यता, पदोन्नती एकाच ठिकाणी:टीईटी घोटाळा

Subscribe

आयुक्त तुकाराम सुपे यांची नाशिकमध्येही २०१३ ते २०१६ या कालावधीत कमाई

नाशिक : टीईटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तुकाराम सुपे हे नाशिकला शिक्षण उपसंचालक असताना एकाच ठिकाणी शाळांना मान्यता, शिक्षण सेवकांना पदोन्नती देत होते. शालार्थ आयडी व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय सुटीच्या दिवशी गंगापूर रोडवरील एका फ्लॅटमध्ये ते बैठका होत असल्याचे आता उघडकीस आले आहे.

टीईटीच्या घोटाळ्यात आयुक्त तुकाराम सुपे याने नाशिकमध्येही २०१३ ते २०१६ या कालावधीत कमाई केली. तर पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकपदाचा कार्यभार शिक्षण मंडळातील शिक्षकांचे ऑनलाइन पगार देण्यासाठी शालार्थ आयडी पाहताना मुलाचा सासरा अर्थात नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा वाहनचालक व्याही सुरेश सोनवणे याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शिक्षक, शिक्षणसेवक मान्यता देण्यासाठीही लाच घेत असल्याचे संस्थाचालकांची अडवणूक करीत तपासातून पुढे येत आहे.

- Advertisement -

टीईटी बरोबरच शालार्थ आयडी देण्याच्या प्रक्रियेची चौकशी केल्यास माया जमविल्याची चर्चा त्याच्या अटकेनंतर सुरू झाली आहे. नाशिक शिक्षण विभागातील इतरही भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी सापडू शकतात, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. नाशिक विभागाचा शिक्षण उपसंचालक असताना सुपे याने त्याच्या व्याह्याकडेच ही माया जमविण्याचे सर्वाधिकार दिले होते. त्यातूनच सुपे याने नाशिकमध्ये उच्च उत्पन्न गटाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणार्‍या गंगापूररोड भागात प्रशस्त फ्लॅट असल्याचेही बोलले जात आहे. उपसंचालक कार्यालयात शाळा मान्यता, शालार्थ आयडी, शिक्षक, शिक्षणसेवक पदोन्नतीसारख्या प्रकरणांमधून अडवणूक करून कार्यालयाबाहेर तडजोड करण्याची प्रथाच सुपे याच्या कार्यकाळात पडली होती.

त्यामुळे नाशिक विभागातील ज्या ठिकाणांपर्यंत सुपे यांचे हात पोहोचले अशा नाशिक,  नंदुरबारमधील नातेवाईकांचीही चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे . सुपे बहुधा सोनवणे याच्याकडे मुक्कामी असायचा. कार्यालयात अडवलेल्या बहुतांश प्रकरणांना तेथेच हिरवा कंदील दिला जाई. त्यामुळे सुपे कार्यालयीन दिवसांत बहुधा पुण्यात आणि सप्ताहाअखेर नाशिकला राहून नियमबाह्य कामकाज पूर्णत्वास नेत असल्याची चर्चा आहे. सोनवणे याने उपसंचालक कार्यालयाचे सर्वाधिकार हातात घेत शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांची अडवणूक केली.

नाशिक विभागातील सर्व संस्थांचे, शिक्षक, कर्मचार्‍यांचे प्रस्ताव,शिक्षणाधिकारी  प्राथमिक, माध्यमिक यांनी दिलेल्या मान्यता, सेवा सातत्य,उपसंचालक कार्यालयाने दिलेले शालार्थ आयडी,उच्च माध्यमिकच्या मान्यता,वेतन पथक कार्यालयाने दिलेले फरक बिले,पगार बिले,मेडिकल बिले या सर्वांची शासनाने निपक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्यास नाशिक विभागात शिक्षण क्षेत्रातील सत्य बाहेर येईल. अनेक एजटांच्या माध्यमातून मोहमाया जमविलेले अधिकारी, क्लार्क, शिपाई दोषी सापडतील. – नीलेश साळुंखे,अध्यक्ष, नाशिक पॅरेटस असोसिएशन

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -