घरमहाराष्ट्रनाशिकशाळा सुरु,विदयार्थी मात्र पोषण आहारापासुन वंचित

शाळा सुरु,विदयार्थी मात्र पोषण आहारापासुन वंचित

Subscribe

जुलैपासून कंत्राटदाराच नाही; साडेसात लाख विद्यार्थी वंचित

नाशिक : ग्रामीण भागासह शहरातील शाळा दि. 4 ऑक्टोबरपासून सुरु झालेलया असताना या विद्यार्थ्यांचा पोषण आहार मात्र बंद झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम जाणवत आहे.जिल्ह्यात 3263 प्राथमिक शाळा आहेत. तसेच दोन लाख 65 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शिक्षण संस्थांच्या शाळेंमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरवला जातो. जून महिन्यात ऑनलाईन पध्दतीने शाळा सुरु झाल्या. तोपर्यंत विद्यार्थ्यांना पोषण आहाराची आवश्यकता नव्हती. मात्र, 4 ऑक्टोबर 2021 पासून ग्रामीण भागासह शहरातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले आहेत. साधारणत: साडेसात लाख विद्यार्थी पोषण आहाराचा लाभ घेतात.

प्राथमिक शाळा बंद असल्या तरी पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचाही आहार बंद आहे. पोषण आहार कंत्राटदाराची राज्य स्तरावरुन नियुक्ती केली जाते. साधारणत: वर्षभराचे कंत्राट दिल्यानंतर सब कंत्राटदाराच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पोषण आहार पोहोचवला जातो. त्याची मुदतच 26 जुलै 2021 रोजी संपलेली आहे. तेव्हापासून विद्यार्थ्यांचा आहार बंद आहे. पोषण आहारच बंद झाल्याने ग्रामीण भागासह शहरातील शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम होत आहे. तरी शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना पूरक आहार मिळणार

विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत पूरक आहार देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून होत आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी आणि सोयाबिन अशा वेगवेगळ्या पॅकेट्समधून हा पोषण आहार शाळांना पुरवला जाणार आहे. मात्र, खासगी शिक्षण संस्थांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांबाबत मात्र परिपत्रकात कोणताही उल्लेख नसल्याने शिक्षण विभागात संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील पात्र शाळांच्या पटसंख्येनुसार १ली ते ५वी आणि ६ वी ते ८वी अशी वेगवेगळी मागणी नोंदवण्याचे आवाहन कंपनीने केली आहे.

पोषण आहार सुरु करण्याबाबत राज्य शासनाकडून अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे 26 जुलै 21 पासून पोषण आहार बंद आहे. शासनाचे आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करु.
                               – राजीव म्हसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -