घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये आले स्मार्ट हेल्मेट; शोधले 15 पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये आले स्मार्ट हेल्मेट; शोधले 15 पॉझिटिव्ह

Subscribe

बाजार समितीत पाच हजार जणांची तपासणी, बाजार समितीमध्ये खळबळ

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजार आवारात मिशन झिरो उपक्रमांतर्गत अत्याधुनिक थर्मल स्क्रिनिंग हेल्मेटद्वारा पाच हजार जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. दरम्यान, या तपासण्या केल्यानंतर १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बाजार समितीमध्ये खळबळ उडाली आहे.
SmartHelmetनाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत ढकांबे, तळेगाव, अक्राळे, पिंपळणारे, दिंडोरी आशेवाडी, वरवंडी, सिन्नर, तसेच शहरालगत असलेल्या, म्हसरूळ, मखमलाबाद, दरी-मातोरी, मुंगसरा, शिंदे, पळसे, आडगाव, दसक-पंचक, नांदूर-मानूर इ. भागांतून मुख्य बाजार समिती आवारात पालेभाज्या व फळभाज्यांची आवक होत असते. तसेच, शेतकरी वर्गासह मापारी, हमाल-व्यापाऱ्यांचीही वर्दळ असते. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची सर्वाधिक भिती या ठिकाणी असते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका व भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या मिशन झिरो अंतर्गत शनिवारी (दि.५) अत्याधुनिक स्मार्ट हेल्मेटद्वारे ४ हजार जणांना थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. यात ५७ कोरोना संशयित आढळून आले आणि यातील १५ जण कोरोनाबाधित आढळून आले. जगातील जर्मन, इटली व अन्य काही देशात या अत्याधुनिक थर्मल स्क्रिनिंग हेल्मेट वापर करण्यात आला होता. त्या धर्तीवर भारतीय जैन संघटनेने चार हेल्मेट महराष्ट्रात आणले असून, मुंबईतील दाट लोकवस्ती असलेला धारावी कोळीवाडा परिसर व पुणे या भागात यशस्वी तपासण्या करण्यात आल्या आहेत. एकावेळी १२ जणांचे थर्मल स्क्रीनींग होते दिवसभरात दाट लोकवस्तीत तपासण्या केल्यास दिवसभरात एक लाख नागरिकांच्या तपासण्या करता येतात हे या स्मार्ट हेल्मेटचे वैशिष्ट्य आहे. नाशिक शहरात या हेल्मेटद्वारे कृषी उत्पन्न बाजार समितीतून तपासण्यांना  करण्यात आल्या.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -