Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र स्पेशल रिपोर्ट : ५० वर्ष जुन्या खैराची ‘पुष्पा’ गँगकडून तस्करी; वनविभाग निद्रिस्त?

स्पेशल रिपोर्ट : ५० वर्ष जुन्या खैराची ‘पुष्पा’ गँगकडून तस्करी; वनविभाग निद्रिस्त?

Subscribe

नाशिक : झरी वनपरिक्षेत्रात ‘पुष्पा’ गँग पुन्हा सक्रिय झाली असून, गुटखा तयार करण्यासाठी दुर्मिळ अशा खैराशी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वनविभागाच्या जागेतील दुर्मिळ व महागड्या खैर वृक्षांची रातोरात कत्तल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या भागातून मोठ्या प्रमाणात खैराची तस्करी होत असतानाही वन विभागाकडून त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

खैराच्या गाभ्यातील लाकडाचा वापर गुटखा बनविण्यासाठी होतो. त्यामुळे खैर लाकडाची महागड्या किंमतीत वजनानुसार विक्री केली जात असल्याने खैराला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पेठ तालुक्याला मौल्यवान अशी वनसंपदा लाभलेली आहे. पर्यटनाच्या द्रष्टीने नैसर्गिक वारसा लाभलेला सावर्णा, झरी, बेजावड, बोरदा, गोळसपाडा, नवापाडा खैराची कातर, शिदुंना, करींदामाळ, बोरथळी, बोरदहाड आदी गुजरात सीमावर्ती भाग पेठ तालुक्याला निसर्गाने वनसंपदेची दिली आहे.

- Advertisement -

सावर्णा झरी या गावादरम्यान सुमारे आठ किलोमीटरचा घनदाट जंगल असलेला पर्यटकांचे लक्ष वेधणारा घाट रस्ता पोकळ हेद, तांबड माती, खैरची कातर आणी याच घनदाट खैराची कत्तल तस्कारांनी रात्रीच्या वेळी करवत कटर मशीनच्या सहाय्याने करून उजाड रान केले. शेकडो लोकांच्या टोळ्या रात्रीच्या वेळी जंगलात शिरून खैराची मोठमोठी वृक्ष कापून २५ ते ३० वाहने भरून खैराचे लाकूड नेले असल्याची चर्चा आहे.

१९७५-७६ साली कुपंन नंबर ७७ मध्ये सुमारे शंभर हेक्टरवर हजारो खैर जातीच्या वृक्षांची लागवड वनविभागाने केली होती. ४८ वर्षाची ही दुर्मिळ खैराची जंगलातील दाटी पाहून पाहणार्‍यालाही हेवा वाटावा, अशा नयनरम्य नैसर्गिक परिसरातील व तालुकावासियांना भूषावह असणारे असे या जंगलाचे नाकच होते.

- Advertisement -

पेठ तालुक्यातील झरी वनपरिक्षेत्र हे सुमारे १६८३.४१ हेक्टर वनजगंल असलेले सात बीटे व पाच कुपंणे असलेला गोळसपाडा व सावर्णा दाट जंगलमय असलेले लाकुड तस्करांच्या निशाण्यावरील बिटे फक्त ११ कर्मचारी व १९ रोजंदारीवरील वॉचमनवर जंगल संरक्षणाची जबाबदारी आहे. सोबत एक रात्रीच्या गस्ती पथकाने वाहन कर्मचारी व दोन पोलीस या जंगलात असणारे तीन टेहळणी नाके व दोन रस्ता चेकनाका होते. मात्र, अनेक वर्षापासून हे नाके वन कर्मचारी नसल्याने व अनुदान उपलब्ध नसल्याने बंद करण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे तस्करी खुलेआम सुरु आहे.

  • झरी वनपरिक्षेत्रात वनविभाग फक्त नावापुरताच आहे. अपुरे मनुष्यबळ, खचलेली मानसिकता, कुपंनच शेत खात असल्याचा संशय आहे.
  • कर्मचार्‍यांना वारंवार मिळणार्‍या धमक्यांमुळे भेदरलेल्या अवस्थेतील कर्मचार्‍यांची मानसिकता खचलेली आहे. यात काही कर्मचारी स्थानिक असल्याने हितसंबंध जोपासले जात असल्याची चर्चा आहे.
  • वन कर्मचार्‍यांनी तस्करांना मालासह पकडले तरी तस्कर हाणामारी करून पसार होत आहेत.

तस्करीसाठी विनाक्रमांकाची वाहने, चेसी क्रमांकामध्ये खाडाखोड

वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी दोन वर्षांत शेकडो घनमीटर लाकूड व १२ वाहने, ३ दुचाकी कारवाईत जप्त केल्या. परंतु, तस्कर पसार झाले. शेवटी कर्मचार्‍यांना माल वाहने बेवारस स्थितीत मिळून आली. वाहनांच्या क्रमांकावरुन गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वाहनांचे नंबरच अस्तित्वात नसतात तर चेसी नंबर खोडून किंवा ठोकून नामशेष केलेले असल्याने गुन्हेगारापर्यंत पोहचण्याचा कोणताच माग मिळत नसल्याने लाकूडतस्कर शोधणे व तस्करी रोखणे आव्हानात्मक आहे.

वनविभागाची डोळेझाक

झरी आंबे वनपरिक्षेत्रात दोन वर्षापासून साग व खैर तस्कारांकडून वृक्षतोड केली जात आहे. अनेक वेळा वनविभागाच्या पथकांना हुलकावणी देवून वाहनांमधून खैर व सागाची लाकडे नेली जात आहेत. अनेक कर्मचार्‍यांवर तस्करांनी हल्ले केले आहेत. तरीही वनविभागामार्फत वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कोणतीच उपाययोजना आखण्यात आलेली नाही. वनविभागातील वणांसाठी अनेक योजनांद्वारे करोडो रुपये खर्ची केले जातात. मात्र, त्याचा कितपत उपयोग होतो हे तपासणारी यंत्रणेचेही पाळेमुळे खोलवर रुतलेले असल्याचे दिसून येत आहे.

गुजरातच्या टोळ्या सक्रिय

गुजरात राज्यातील खैर तस्कारांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याचा मोठा प्रश्न वनविभागासह राज्य शासनासमोर आहे. या खैर लूटप्रकरणी आता जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांवर काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

- Advertisment -