घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिवसेनेच्या 'त्या' ताईंगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार

शिवसेनेच्या ‘त्या’ ताईंगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार

Subscribe

नाशिक : दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर जाणार्‍या नाशिकच्या महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांची छेड काढणार्‍या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना चोप देणार्‍या ‘ताई’गिरी दाखवणार्‍या महिला शिवसैनिकांचा नाशिकमध्ये सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांच्या हस्ते भगवी शाल देवून या महिलांचा सत्कार झाला.

शालिमार चौकातील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी (दि.6) हा सोहळा पार पडला. या रणरागिणींमध्ये उपजिल्हा संघटक मनीषा खांडबहाले, पश्चिम विधानसभा संघटक आलका गायकवाड, तालुका संघटक ज्योती भागवत, गायत्री पगार व श्रुती नाईक, शिवसेना महिला संघटक मीना देवकर, सीमा डावखर, भारती पाईकराव, संध्या धूमाळ, पुष्पा राठोड, मदुरा नाडर, मुक्ता लहाने, गंगू घुगे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी नाशकातील महिला आघाडीच्या पदाधिकारी मुंबई येथे जात असताना खर्डी येथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांकडे अश्लिल हावभाव करत छेड काढली. त्यामुळे संतापलेेल्या शिवसेनेच्या या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला. महिलेशी गैरवर्तन केलेले शिवसेना कधीच खपवून घेणार नाही, हे सर्वांनी लक्षात घावे, असा इशाराही सुनील बागूल यांनी या कार्यक्रमाप्रसंगी दिला. यावेळी सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -