घरमहाराष्ट्रनाशिकचहाविक्रेत्याची गोदावरी नदीपात्रात आत्महत्या

चहाविक्रेत्याची गोदावरी नदीपात्रात आत्महत्या

Subscribe

कर्जबाजारीपणामुळे संपवले जीवन

नाशिक : कर्जाचे हप्ते थकल्याने चहाविक्रेत्याने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांना चहाविक्रेत्याच्या खिशातील चिठ्ठी सापडली आहे. त्यातून चहाविक्रेत्याने कर्ज थकल्याने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास ऊर्फ तानाजी किसन मंडलिक (वय ४२) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आनंदवली परिसरातील पद्मदर्शन सोसायटीतील विलास मंडलिक यांनी गोदावरी नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली .त्यांचे आनंदवली परिसरात चहाचे दुकान होते. कर्जाचे हप्ते थकल्याने ते अनेक दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यातून तेदोन दिवसांपूर्वीघरातून निघून गेले होते. ते बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, आनंदवली नदीच्या जुन्या पुलाजवळ नदीपात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -