घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस अधीक्षक सचिन पाटील मराठा रत्न पुरस्काराने सन्मानित

पोलीस अधीक्षक सचिन पाटील मराठा रत्न पुरस्काराने सन्मानित

Subscribe

छावा मराठा संघटना व छावा क्रांतीवीर सेना यांच्याकडून सन्मानित

नाशिक : वर्षभरातील सकारात्मक आणि रचनात्मक उपक्रमशील पोलिसिंगची दखल घेऊन जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख सचिन पाटील यांना छावा मराठा संघटना व छावा क्रांतीवीर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठा रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर, छावा क्रांतीवीर सेना संस्थापक करण गायकर, मनपा गटनेते विलास शिंदे, विशाल पांगारकर, अ‍ॅड. मयुर पांगारकर आदींच्या उपस्थितीत हा सन्मान त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

सप्टेंबर 2020 मध्ये सचिन पाटील यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यापासून डिसेंबर 2021 या जवळपास सव्वा वर्षाच्या कालखंडात जिल्ह्यात पोलीस दलाने केलेल्या कामगिरीचा या पुरस्कारासाठी प्रामुख्याने विचार करण्यात आला. छत्रपतींच्या महाराष्ट्रात ‘मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या धारणेवर काम करण्याची मानसिकता व्यवहाराच्या बोलीने झाकोळू लागल्याने सचिन पाटील यांच्यासारखे अधिकारीही प्रशासकीय सेवेत आहेत, म्हणून मराठा रत्न हा पुरस्कार त्यांना प्रदान झाल्याने पुरस्काराचाच खर्‍या अर्थाने गौरव झाला, अशी भावना दातृत्व संस्थांनी यावेळी व्यक्त केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -