ऐकावे ते नवलच : मंतरलेले लिंबू आले दरवाजात अन्…

लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी आणि धारदार शस्त्राने केली मारहाण

मंतरलेले लिंबू दरवाजात टाकल्याच्या अंधश्रद्धेतून शेजार्‍यांमध्ये झालेल्या भांडणात बेदम हाणामारी झाल्याचा प्रकार के. बी. एच. शाळेसमोर, वडाळागावात बुधवारी (दि.२) रात्री घडला. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

अफसर अन्सार शहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अल्ताफ शहा यांच्या घरातून अफसर शहा यांच्या दरवाजात लिंबू आले. याप्रकरणी अफसर शहा यांचे वडील अन्सार शहा यांनी विचारणा केली. राग अनावर झाल्याने अल्ताफ शहा, अख्तर ऊर्फ विकी शहा, जावेद शहा, गुलाब शहा यांनी अफसर शहा यांना लोखंडी रॉड व लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली.

मेहजबी अख्तर हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अन्सार शहा, निसार शहा, अफसर शहा यांनी दरवाजात लिंबू फेकल्याचा जाब विचारला. तिघांनी कुरापत काढून मेहजबी हुसेन व त्यांच्या मुलास शिवीगाळ आणि लोखंडी रॉड व धारदार शस्त्राने मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.