घरमहाराष्ट्रनाशिकअन्यायकारक कारवाईविरोधात मिठाई विक्रेत्यांचे आंदोलन

अन्यायकारक कारवाईविरोधात मिठाई विक्रेत्यांचे आंदोलन

Subscribe

प्लास्टिक वापराच्या मानकांचे पालन करूनही होतोय जाच

नाशिक : शहरात प्लास्टिक बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे सांगत पालिकेच्या वतीने होत असलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शहर आणि उपनगरातील मिठाई व्यापार्‍यांनी सोमवारी (दि.७) महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्तांना निवेदन दिले. प्लास्टिक वापराच्या मानकांचे पालन करूनही कारवाई होत असल्याबाबत यावेळी निषेध व्यक्त केला.

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या बंदीबाबत पालिका अधिकारी, कर्मचार्‍यांमध्येच काहीशी गोंधळाची स्थिती असल्याची तक्रार यावेळी मिठाई व्यापार्‍यांनी केली. कोणते प्लास्टिक वापरायचे, कोणते नाही याबाबत कर्मचार्‍यांनाच माहिती नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

- Advertisement -

५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक व नॉन ओव्हन पिशव्या वापरावर बंदी आहे. मात्र, मिठाई विक्रेते पार्सल सुविधेसाठी ३०० मायक्रॉन जाडीचे कंटेनर तसेच शासन निर्देशाप्रमाणे पिशव्यांचा वापर करत असतानाही महापालिकेकडून कारवाई करत व्यापार्‍यांना पाच हजार रूपयांचा दंड केला जात आहे.

मुळात किराणा दुकानदार तसेच इतर विक्रेते जे प्लास्टिक वापरतात तेच प्लास्टिक वापरत असतानादेखील पालिका प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या अन्यायकारक कारवाईचा मिठाई असोसिएशनने निषेध नोंदवला. त्यामुळे ही कारवाई थांबवावी, अशी मागणी असोसिएशनने केली. यावेळी मिठाई व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिपक चौधरी, सचिव कपिल भदाणे, मांगीलाल सोलंकी, गणपत चौधरी, गमनाराम चौधरी, मुकेश चौधरी, दलाराम चौधरी, भोलाराम चौधरी, शिवलाल चौधरी आदी उपस्थित होते.

मिठाई विक्रेते शासन निर्देशांप्रमाणेच प्लास्टिक वापराबाबत मानकांचे पालन करतात. मात्र, तरीही पालिका पथकांकडून व्यापार्‍यांवर ५ हजारांची दंडात्मक कारवाई केली जाते. व्यापार्‍यांना खोटे ठरवून कारवाई होत असल्याने या अन्यायकारक कारवाईचा आम्ही निषेध करतो.
– दीपक चौधरी, अध्यक्ष

मिठाई असोसिएशन, नाशिकशासनाने शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मिठाई विक्रेते ३०० मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे कंटेनर वापरतात. मुळात महापालिकेच्या पथकालाच याबाबतची माहिती नाही. त्यामुळे महापालिकेने कार्यशाळेचे आयोजन करून आम्हाला मार्गदर्शन करावे.
– कपिल भदाणे, सचिव

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -