घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकळवणला फडकला उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवध्वज

कळवणला फडकला उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिवध्वज

Subscribe

कळवण : शहरात साकारत असलेल्या नियोजित शिवस्मारकात समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच १७१ फूट शिवध्वजाची प्रतिष्ठापना विजयादशमीच्या मुहूर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत आणि हजारो शिवप्रेमींच्या साक्षीने झाली.

कळवणच्या शिवतीर्थावर झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला व्यासपिठावर श्री आनंद पंचायती आखाडाचे सचिव श्री श्री १००८ श्री गणेशानंद सरस्वती महाराज, अभिनेते शंतनू मोघे, ह.भ.प. संजयनाना धोंडगे, प्रा. यशवंत गोसावी, आमदार नितीन पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, नगराध्यक्ष कौतिक पगार, तहसीलदार बंडू कापसे, पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, बाबुलाल पगार, देविदास पवार, बेबिलाल संचेती, डॉ. रावसाहेब शिंदे उपस्थित होते. छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार व सदस्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे म्हणाले की, कळवण येथे साकारत असलेले शिवस्मारक हे पुढच्या असंख्य पिढ्यांना प्रेरक ठरणार असून अध्यक्ष पगार यांची संकल्पना कौतुकास्पद आहे. पुढील काळात शिवविचारांचा वारसा जोपासण्यासाठी हा शिवध्वज उर्जा देणारा ठरेल असे मोघे यांनी सांगितले. शिवव्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी कळवण तालुक्याला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचे सांगून हे स्मारक उत्तर महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींसाठी दिशादर्शक ठरेल असे सांगितले. यावेळी १५ यजमान जोडप्यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. हर्षवर्धन खैरनार व राधिका पाटील या विद्यार्थ्यांनी भाषण केले. प्रास्ताविक दीपक हिरे यांनी केले. सूत्रसंचलन राकेश हिरे यांनी केले.

- Advertisement -

]कार्यक्रमास शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, राजेंद्र भामरे, राजेश पगार, अविनाश पगार, जयेश पगार, अतुल पगार, गौरव पगार, राहुल पगार, तेजस पगार, बाळासाहेब जाधव, मयूर बहिरम, चेतन मैंद, नितीन पगार, आबा सूर्यवंशी, मनीष पगार, बाळासाहेब गांगुर्डे, सुनील गांगुर्डे, सुधाकर खैरनार, रोहित पगार, हरीश जाधव, मनोज पगार, जितेंद्र कालावडिया, परेश कोठावदे, दिनेश पवार, मयंक मोहिते, चेतन पगार, सोनू निकम, संदीप पगार, तुषार मालपुरे, नरेंद्र चव्हाण, रंजन देवरे आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणुकीने वेधले लक्ष

शिवध्वजारोहनापूर्वी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात आणि पारंपरिक लोककलेच्या सादरीकरणातून शिवध्वजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी ध्वजपूजन केले. शिवतीर्थावर शाहिरी गीतांना शिवप्रेमींनी दाद दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -