घरमहाराष्ट्रनाशिकशालार्थ आयडीसाठी ‘टीडीएफ’चा ठिय्या

शालार्थ आयडीसाठी ‘टीडीएफ’चा ठिय्या

Subscribe

माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांचा कार्यालयात शिक्षकांचे धरणे आंदोलन

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेतन मिळाले पाहिजे, गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील कर्मचार्‍यांना पुरवणी बिलांचे पैसे मिळालेले नाहीत, शालार्थ आयडीचे काम मार्गी लावून नाशिक विभागातील कर्मचार्‍यांचे वेतन तत्काळ सुरू करण्याच्या मागण्यांसाठी शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सोमवारी (ता. ६) माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला.

जिल्हा परिषदेच्या इमारतीबाहेर शिक्षकांनी धरणे आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या. शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक या दोन्ही पदांचा कार्यभार नितीन बच्छाव यांच्याकडे आहे. त्यामुळे नाशिक विभागातील चारही जिल्ह्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यावर शिक्षकांनी आक्षेप घेत शिक्षण उपसंचालक म्हणून तसेच वेतन पथक अधिक्षक म्हणून पूर्ण वेळ अधिकारी का नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच अनेक वर्षांपासून पी.एफ.च्या पावत्या मिळालेल्या नाहीत. डी.सी.पी.एस. धारकांचा हिशोब नाही व अनेकांची खातेही उघडलेले नाही. पदोन्नतीच्या मान्यता का थांबल्या आहेत? अनुकंपा तत्त्वावरील पद भरतीस पात्र उमेदवारांवर होणार्‍या अन्यायास जबाबदार कोण? असे प्रश्न त्यांनी निवेदनाव्दारे उपस्थित केले आहेत. कार्यालयातील अनागोंदी व भ्रष्टाचारास जबाबदार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आर. डी. निकम, बाळासाहेब सोनवणे यांसह शिक्षक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -