घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'टेडी डे’ ; तरुणी डोरेमॉन-पॉकेमॉनवर फिदा

‘टेडी डे’ ; तरुणी डोरेमॉन-पॉकेमॉनवर फिदा

Subscribe

५० रुपयांपासून टेडी उपलब्ध

 नाशिक :  व्हॅलेंटाईन्सच्या रोमॅन्टिक आठवड्यामधील १० फेब्रुवारी हा चौथा दिवस टेडी डे म्हणून साजरा केला जातो. टेडी बेअर प्रिय व्यक्तीला गिफ्ट देत या आठवड्याची रंगत वाढवण्यासाठी हा दिवस ओळखला जातो. शहरातील दुकाने व्हॅलेंटाईन्स वीकच्या पार्श्वभूमीवर गजबजलेली आहेत. बुधवारी चॉकलेटच्या गोडव्याने नवीन नात्यात गोडवा आला आणि आज साजर्‍या केल्या जाणार्‍या टेडी डेला आपल्या आवडत्या व्यक्तीला टेडी बेअर भेट देवून प्रेम वाढवले जाते. यंदाच्या टेडी डेला तरुण-तरुणी डोरेमॉन, पॉकेमॉन कार्टूनच्या टेडीवर फिदा झालेल्या दिसून येत आहेत.

 बोलके टेडीही बाजारात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. बोलक्या टेडीमधून विविध आकर्षक आवाजात प्रेमाचे मेसेज ऐकू येतात. त्याशिवाय आपण यात कस्टमाईज मॅसेजदेखील रेकॉर्ड करू शकतो. टेडीचा गोंडसपणा तुमच्या नात्यामध्येही राहावा म्हणून आवडत्या व्यक्तीला टेडी दिला जातो. आपली सोबत नसतानाही हा टेडी आपली उणीव भासू देणार नाही, असाही त्यामागील भाव असतो. बहुतांश मुला-मुलींना रात्री टेडी कुशीत घेवुन झोपण्याची सवय असते. काही कारणास्तव तुमचा आवडता व्यक्ती तुमच्यासोबत नसेल तर हाच टेडी त्याची जागा भरून काढतो.आपल्या आवडत्या व्यक्तीला टेडी गिफ्ट करून त्या व्यक्तीला हेदेखील सांगा की, ती तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे’. त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट व्हायला मदत होईल. या वीक निमित्त ऑनलाईन शॉपिंग साईट्सवरूनही गिफ्ट्स खरेदीला बहार आलेला दिसत आहे. ५० रुपयांपासून ते अगदी पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत टेडी बाजारात उपलब्ध आहेत.

- Advertisement -

हे आहेत फेमस टेडीचे प्रकार :

टेडी किचन, टेडी विथ मेसेज, टेडी कुशन, टेडी विलचॅम, चॉकलेट टेडी, म्युझिकल टेडी, रेकॉर्डेड टेडी, कार्टून टेडी

अशा आहेत टेडीच्या किमती : 

  • टेडी किचन ५० रुपयांपासून पुढे
  • कार्टून टेडी १०० रुपयांपासून
  • बोलके टेडी ३०० ते ५००० हजार रुपयांपर्यंत
  • टेडी कुशन १५० ते ५०० रुपयांपर्यंत

यंदा तरुणांचा कल डोरेमॉन, पॉकेमॉन यांसारख्या कार्टून पात्रांच्या टेडीकडे अधिक दिसून येत आहे. याशिवाय टेडी किचन आणि बोलक्या टेडीलाही चांगली मागणी आहे .– मोहित शिंदे, टेडी विक्रेता

 

 

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -