घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्ये शाळांची मनमानी सुरुच

लॉकडाऊनमध्ये शाळांची मनमानी सुरुच

Subscribe

फी भरण्यासाठी पालकांना मेसेच; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवेदन

नाशिक : करोना विषाणुने थैमान घातल्याने सर्वत्र ताळेबंदी लागू केलेली असताना शाळांना सक्तीची फी वसुली न करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, या आदेशाचे सर्रासपणे उल्लंघन करुन काही शाळा फी वसुलीसाठी पालकांना मेसेज पाठवत असल्याचे दिसून येते. पालकांनी या प्रकरणाच निशेष नोंदवला असून या शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच बसले आहेत. काम, धंदे बंद झाले असून आर्थिक परिस्थिती खूपच कठीण झाली आहे. आशा परिस्थिती काही मुजोर शाळांनी पालकांना येत्या 30 तारखेच्या आत पैसे भरण्याची सक्ती केली आहे. अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येईल अशा प्रकारचे मेसेज पाठवले आहेत. इतक्या कमी वेळात फी  आणायची कशी? असा प्रश्न पालकांना पडला आहे. अशा मुजोर शाळांनी कोणत्याही पालकाकडे बळजबरी करू नये, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक मुर्तडक, नाशिक शहराध्यक्ष अंकुश पवार, मनसे विद्यार्थी सेनेचे शशिकांत चौधरी, उमेश भोई, बाजीराव मते, नितीन धानापुणे, स्वप्नील विभांडीक, सागर दाणी, रंजन पगारे, प्रशांत गायकवाड आदिनी केली आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -