घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा उद्रेक

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा उद्रेक

Subscribe

आठवडाभरात या आजाराच्या रुग्णांची संख्या तब्बल १२२ ने वाढून ५८२ पर्यंत

जिल्ह्यात कोरोना ओसरत असला तरी काळ्या बुरशीमुळे होणार्‍या म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. आठवडाभरात या आजाराच्या रुग्णांची संख्या तब्बल १२२ ने वाढून ५८२ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर 10 टक्के असून, आतापर्यंत 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणे आढळून येत आहेत. दिवसेंदिवस या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जिल्ह्यात आठ दिवसांत १२२ रुग्णाची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. ८ जूनला म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात ४६८ रुग्ण होते. आता ५82 रुग्ण आहेत. या आजारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ८ जूनला ४१ होती, ती २१ जूनपर्यंत 63 झाली आहे. त्यानुसार नऊ दिवसांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर 10 टक्क्यांपर्यंत असल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिसच्या आजाराचे लवकर निदान झाले, तर वेळीच उपचार सुरू करता येतात. परंतु, ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचली, तर ती जीवघेणी ठरत आहे. जिल्ह्यात २३१ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये १५७ नाशिक शहरात आहेत. ६१ रुग्णांवर इगतपुरीतील एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

म्युकरमायकोसिसच्या ३८५ गंभीर रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यामध्ये नाक, जबड्याच्या शस्त्रक्रियेसह काही रुग्णांचे डोळेदेखील काढण्यात आले आहेत. ८ जूनपर्यंत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या २१७ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर आठवडराभरात १६८ रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

351 रुग्णांची म्युकरवर मात

जिल्ह्यात एकूण २८३ रुग्णांनी म्युकरमायकोसिसवर मात केली आहे. त्यामध्ये शहरातील खासगी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणारे २००, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ३४, एमव्हीपीमध्ये १८, तर एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेऊन बरे होणारे 10 जण आहेत. मालेगावातील 6 रुग्णांनीदेखील म्युकरमायकोसिसवर मात केली आहे.

- Advertisement -

या ठिकाणी होणार रुग्णांवर उपचार

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांना विनाविलंब उपचार वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य व पंतप्रधान जनकल्याण योजनेअंतर्गत राबविली जात आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचारासाठी रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. शहरी भागासाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय, बिटको रुग्णालय व डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय, आडगाव येथे उपचार केले जात आहेत. तर ग्रामीण भागासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय आणि एस. एम. बी. टी. वैद्यकीय महाविद्यालय, धामणगाव (ता. इगतपुरी) येथे मोफत उपचार केले जात आहेत. त्याचा दैनंदिन अहवाल जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याकडे सादर केला जातो आहे.

म्युकरमायकोसिस अहवाल

  • रुग्णसंख्या ५82
  • शस्त्रक्रिया झालेले रुग्ण ३८५
  • म्युकरमुक्त रुग्ण ३५१
  • म्युकरमुळे मृत्यू 63
  • सध्या उपचार घेणारे २३१
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -