घरमहाराष्ट्रनाशिकओबीसींचा आक्रोश मराठा समाजाविरोधात नाही

ओबीसींचा आक्रोश मराठा समाजाविरोधात नाही

Subscribe

दोन्ही समाज अडचणीत, पालकमंत्री भुजबळ यांच वक्तव्य

माझा किंवा राष्ट्रवादीचा मराठा आरक्षणाला विरोध नाहीच. पण मराठा आरक्षणाला माझा विरोध असल्याचे भासवले जात आहे. मराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे या मताशी कोणाचेही दुमत नाही. माझ्या पक्षाचीदेखील तीच भूमिका आहे. कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळावे ही सगळ्यांची भूमिका आहे. अनेक अडचणी आहेत. ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत. दोन्ही समाज अडचणीत आहेत. मराठा समाजाला आरक्षण नाही आणि ओबीसींचे आरक्षण काढले, त्यामुळे दोन्ही समाजांसमोर ही अडचण निर्माण झाली आहे, असे भुजबळ म्हणाले.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरे मराठा मूक आंदोलन सोमवारी (दि.२१) नाशिकमध्ये झाले. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चास्थळी हजेरी लावली. राष्ट्रवादीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आंदोलनस्थळी उपस्थिती लावत आपली भूमिका मांडली. यावेळी भुजबळ म्हणाले, नाशिकमध्ये होणार्‍या मूक आंदोलनाबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत बोलणे झाले आणि मी त्यांना ताबडतोब सांगितले की मी येणार. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही. “काही लोकांचे म्हणणे आहे की, ओबीसींचे आक्रोश मोर्चे सुरू झाले, ते मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी. प्रत्यक्षात मात्र असे अजिबात नाही. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी ओबीसींचा आक्रोश मोर्चा नाही. मराठा आणि ओबीसी समाज अडचणीत आहे. मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले आणि ओबीसींच्या असलेल्या आरक्षणावरही गदा आणली. कायद्याच्या कचाट्यात सापडल्यावर या अडचणी निर्माण होतात. दोन्ही समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे बरं नाही”, असे भुजबळ म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -