घरताज्या घडामोडीभावाला बँकेत संयुक्त खाते उघडणे पडले महागात; बहिणीने लॉकरमधून परस्पर केले दागिने...

भावाला बँकेत संयुक्त खाते उघडणे पडले महागात; बहिणीने लॉकरमधून परस्पर केले दागिने लंपास

Subscribe

बँकेत संयुक्त खाते उघडून लॉकरमध्ये दागिने ठेवणे भावास महागात पडले असून बहिणीने परस्पर दागिने लंपास केल्याची घटना नाशिक मर्चंट को-ऑप. बँक, पंचवटी येथे घडली. याप्रकरणी म्हसरुळमधील आशिष बाळासाहेब चांदवडकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी मनमाड येथील संशयित वैशाली बाळासाहेब चांदवडकर ऊर्फ वैशाली प्रवीण व्यवहारे (वय ४७) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष चांदवडकर व वैशाली व्यवहारे हे नात्याने बहीणभाऊ आहेत. दोघांनी नाशिक मर्चंट को-ऑप. बँक, पंचवटी येथे संयुक्त खाते उघडले. त्यावेळी त्यांनी लॉकरची सुविधासुद्धा घेतली होती. आशिष चांदवडकर यांनी विश्वासाने वैशाली व्यवहारेकडे लॉकरची चावी दिली होती. आशिष चांदवडकर यांनी लॉकरमध्ये सोने व चांदीचे दागिने ठेवले होते. ही बाब वैशाली व्यवहारे हिला लॉकर उघडले असता समजली. तिने भाऊ आशिष चांदवडकर यांना काही न सांगता लॉकरमधून परस्पर दागिने लंपास करत आशिष चांदवडकर याचा विश्वासघात केला. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक यु. आर. गवळी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -