घरक्राइमनोटप्रेस : कथित चोरीचा तपास लागला; नोटा मिसप्लेस, दोन सुपरवायझर निलंबित

नोटप्रेस : कथित चोरीचा तपास लागला; नोटा मिसप्लेस, दोन सुपरवायझर निलंबित

Subscribe

राज्यभरात गाजलेल्या नाशिक रोड येथील नोटप्रेसमधून चोरीस गेलेल्या पाच लाखांच्या नोटांचा तपास लावण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. पाच लाखांच्या या नोटा चोरीस गेल्या नसून कामाच्या व्यस्ततेत कटपॅक सेक्शनमधील दोन सुपरवायझरकडून पंचिंग झाल्याचे समोर आले आहे. या दोघांनी प्रेस व्यवस्थापनाला लेखी पत्र देऊन चुक कबूल केली असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीत प्रेसमधून पाच लाखांच्या पाचशेच्या नोटांचा बंडल चोरीस गेल्याची तक्रार 13 जुलैला उपनगर पोलीस ठाण्यात प्रेस व्यवस्थापनाने दाखल केली होती. प्रेसने सहा महिने अंतर्गत तपास केल्यानंतरही माग लागला नव्हता. पोलिसांनी तपासा दरम्यान संबंधित विभागातील अधिकारी व कामगारांकडे चौकशी सुरु करूनही काहीच माहिती सुरुवातीस हाती लागत नव्हती. पोलिसांनी नोटा छपाईची सर्व प्रक्रिया माहित करून घेतली. हा बंडल शेवटी कोणाच्या निदर्शनास आला याची माहिती घेतली. प्रेसमधील कटपॅक सेक्शन व पॅकिंग सेक्शनचे रेकॉर्ड तपासले. त्यावरून चोरीस गेलेला बंडल 12 फेब्रुवारीला तपासणीसाकडून तपासला गेल्याचे दिसले. परंतु, त्याबाबत निश्चितता होत नसल्याने पूर्ण पार्सल तपासले असता या ठिकाणी दुसराच बंडल चेक केल्याचे दिसून आले. या ठिकाणी सीआयएसएफची सुरक्षा यंत्रणा कडक असल्याने नोटा बाहेर जाणे शक्य नव्हते.

- Advertisement -

सर्व कामगारांची झडती जाताना व येताना घेतली जाते. पोलिसांनी कामगारांना विश्वासात घेऊनही ठोस माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी सुपरवायझरला लक्ष्य करून रेकार्ड तपासले. त्यात कटपॅकच्या दोन सुपरवायझरकडेच तपास केंद्रित झाला. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी खरी माहिती देण्यास वेळ मागितला. कारवाईच्या भितीने 24 जुलैला त्यांनी व्यवस्थापनाला कबुली दिली. त्यांनी दिलेल्या कबुली जबाबाची खात्री केल्यावर वर्कमॅनच्या तपासात दुजोरा मिळाला. पोलिसांनी कटपॅक सेक्शनमधील स्ट्राँग रूम तसेच रेकार्ड रजिस्टर, स्टार नोटांचे रजिस्टर बारकाईने तपासले. सुपरवायझरच्या वरिष्ठ व्यवस्थापकांना याची माहिती होती का याचा तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -