घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र‘पीएफआय’च्या सातव्या संशयितासही न्यायालयीन कोठडी

‘पीएफआय’च्या सातव्या संशयितासही न्यायालयीन कोठडी

Subscribe

नाशिक : देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली एनआय व महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या वादग्रस्त पीएफआय’चा सातव्या संशयिताला जिल्हा न्यायाधीश ए. यू. कदम यांनी सोमवारी (दि.२८) न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. इरफान दौलत खान नदवी उर्फ मौलाना इरफान खान असे सातव्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांनी एकूण सात संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने या सर्व संशयितांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांच्या तपासानुसार न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सप्टेंबर महिन्यात देशभरात एकाचवेळी पहाटेच्या सुमारास दहशतवादविरोधी पथक व एनआयएच्या माध्यमातून छापेमारी करत ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या संशयित सदस्य व पदाधिकार्‍यांची धरपकड केली होती. नाशिक दहशतवादविरोधी पथकाने मालेगावातून दोघांना अटक केली होती. तसेच मागील महिन्यात २१ तारखेला जळगावातून संशयित उनैस उमर खय्याम पटेल (३२) यास अटक केली होती. त्यानंतर मालेगावातून रविवारी (दि.१३) मौलवी इरफान यास एटीएसने अटक केली. एटीएसने यापूर्वी अटक केलेल्या सहा संशयितांसोबत खानचा सातत्याने संपर्क होता. संशयितांसोबत त्याने ५०० वेळा तर उर्वरित पीएफआयच्या अन्य संशयितांसोबतसुद्धा ६०० वेळा संवाद केल्याचे तपासात समोर आले होते. जिल्हा न्यायालयात (दि.१४) खान यास हजर करण्यात आले असता जिल्हा न्यायाधीश कदम यांनी खान यास १४ दिवसांची एटीएस कोठडी सुनावली होती. दरम्यान, 28 नोव्हेंबर रोजी कोठडीची मुदत संपल्याने एटीएसने त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -