घरमहाराष्ट्रनाशिकखेळण्यांनी फुलवला त्यांच्या चेहर्‍यावर आनंद

खेळण्यांनी फुलवला त्यांच्या चेहर्‍यावर आनंद

Subscribe

लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारतर्फे ‘टॉय ऑफ जॉय’ उपक्रम; ब्राह्मणवाडे विद्यालयात कार्यक्रम

मूले मोठी झालीत की त्यांची खेळणी अडगळीत पडते. तिच ती खेळणी खेळूनही अनेकवेळा मुले कंटाळतात. पण अशी काही बालके आहेत, ज्यांना खेळणी मिळणे हा ‘भाग्या’चा विषय समजला जातो. ही बाब लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारन ‘टॉय फॉर जॉय’ उपक्रमांतर्गत क्रेंबीज स्कूलच्या विद्यार्थ्यांना जुनी खेळणी आण्याचे आवाहन केले. त्यानुसार सुमारे ३५० पेक्षा अधिक खेळणी विद्यार्थ्यांनी उत्साहात जमा केली. या खेळण्यांचे वाटप त्र्यंबकेश्वर येथील ब्राह्मणवाडे गावात करण्यात आले. यासह पाच समाजोपयोगी उपक्रम यावेळी राबवण्यात आलेत.

लायन्स क्लब ऑफ नाशिक स्टारच्या अध्यक्षा नीलिमा डावरे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना बुटं आणि सॉक्स यांचे वितरण करण्यात आले. तसेच टॉय फॉर जॉय ही आगळी वेगळी राबवली. अर्चना सिंग यांनी खेळणी संकलनाची जबाबदारी पार पाडली. नाशिक केम्ब्रिजचे मुख्याध्यापक सुंदरम, उपमुख्याध्यापिका विजया पाटील आणि नाशिक केम्ब्रिज मॅनजमेंटने या वेळी सहकार्य केले. यावेळी केम्ब्रिज स्कूलच्या शिक्षिका तृप्ती पाटील, समीरा भगत आणि रंजना पाटील, जेडीसी बटको महाविद्यालयातील मॅनेजमेंटचे विद्यार्थी तसेच ब्राम्हण वाडे येथील सेवाभावी दाम्पत्य पुरोहित हे या प्रसंगी उपस्थित होते. तसेच क्लबने गेल्या वर्षी माध्यमिक शाळेतील कॉम्पुटर लॅब उभी करुन दिली होती. या लॅबला यंदा इंटरनेटची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. या नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन्सिल आणि खाण्याच्या पदार्थांचे वितरण करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून कारगिल युद्धातील सैनिकांना मानवंदना देण्यात आली. या वेळी क्लबच्या अध्यक्षा नीलिमा डावरे, सेक्रेटरी डॉ. नुपुरा प्रभू, कोषाध्यक्ष सारिका कलंत्री, माजी प्रांतपाल विनोद कपूर, अविनाश कपूर, त्र्यंबकेश्वर येथील रामकृष्ण आरोग्य मिशनचे संस्थापक श्रीकंठानंद स्वामी, झोन चेअरपर्सन सीए राम डावरे, नितीन मराठे, अमित प्रभू, प्रशांत भरबत, संतोष कलंत्री, अभय बाग, ब्राम्हणवाडे माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक गीते, घेगडमल, माळेकर, बोरसे, जाधव, राहुडे आदी उपस्थित होते. आर. डी. साबळे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -