घरमहाराष्ट्रनाशिकशहरात तब्बल बाराशे धोकेदायक वाडे व इमारती

शहरात तब्बल बाराशे धोकेदायक वाडे व इमारती

Subscribe

मनपाची नोटीस ; रिकामे नाही केले तर करणार कारवाई

नाशिक : गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये पावसाळ्यामध्ये धोकादायक वाडे कोसळण्याचे प्रकार वाढल्याचे लक्षात घेता यंदा महापालिकेने तत्परता दाखवत एप्रिल महिन्यातच शहरातील सहाही विभागांमधील १२०२ धोकेदायक घरे, जुनी वाडे, इमारतींपैकी : धोकेदायक व अतिधोकेदायक असलेल्या ७०३ घरे, धोकेदायक वाडे, इमारती तसेच बांधकाम स्वतःहून काढून घेण्याबाबत म मालक, भाडेकरूंना नोटिसा जारी केल्या आहेत.

एवढेच नव्हे तर शहरातील ३० वर्षांहून अधिक जुन्या इमारती, वाड्यांचे सर्वेक्षण करून त्यानंतर संबंधितांना संरचनात्मक परीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सक्ती केली जाणार आहे. मुंबई, पुण्यानंतर नाशिकचा झपाट्याने विकास होत असून त्यांचाच एक भाग म्हणून लोकांना राहण्यासाठी गगनचुंबी इमारती बांधून घरे उपलब्ध करून दिली जात आहे. सद्यस्थितीमध्ये शहरात जुन्या व नव्या मिळून साडेचार लाख मिळकती आहेत. शहराचा विकास करताना लगतच्या तुमच्या खेड्यांमध्ये आता मोठे बांधकाम प्रकल्प होईल. मात्र अद्यापही प्रमुख बाजारपेठ व नाशिकची मुख्य भागात असलेला भाग म्हणून जुने नाशिक, पंचवटी गावठाणयालाच मुख्य बाजारपेठ मानले जाते. येथेच बहुतांश नागरिकांचा रहिवास आहे.

- Advertisement -

दरम्यान, जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड, देवळालीगाव, सातपूर या गावठाणांमध्ये आजही जुन्याच घरांमध्ये, तसेच इमारती आणि वाड्यांमध्ये रहात आहेत. मालक व भाडेकरूमध्ये असलेल्या मालकीच्या वादावरून लोक जीव मुठीत धरत राहताना दिसत आहे. मात्र, पावसाळ्यामध्ये अशा इमारती कोसळण्याची भीती असते. ही बाब लक्षात घेत महापालिकेने यंदा एप्रिल महिन्यातच सावध होत शहरांमध्ये ३० वर्षांपेक्षा जुन्या मिळकती, वाडे, इमारतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेने जाहीर प्रकटनाद्वारे धोकादायक इमारती सत्त्वर मोकळ्या कराव्यात अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६८ नुसार पोलिसांमार्फत इमारती मोकळ्या करून घेण्यात येतील, असा इशारा दिला आहे.

कुठे किती धोकेदायक इमारती
नाशिक पश्चिम ६४२, पंचवटी १९५, नाशिकरोड १२८, नाशिक पूर्व ११७, सातपूर ७०, सिडको ५८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -