घरमहाराष्ट्रनाशिकआता उरले शेवटचे दोन दिवस; उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उडणार धांदल

आता उरले शेवटचे दोन दिवस; उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उडणार धांदल

Subscribe

राजकीय हालचालींना वेग : उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी, परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिले असताना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाही सज्ज झाले आहे.

मर्यादीत जागा आणि इच्छुकांची भाऊगर्दी यामुळे विविध राजकीय पक्षांनी अद्यापपर्यंत इच्छुकांना ‘वेटिंग’वर ठेवले आहे. उमेदवारी देताना काट्याची टक्कर बघायला मिळत आहे. अशा स्थितीत उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी बंडखोरीची तयारी दर्शवली आहे. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली, मात्र पितृपक्ष तसेच जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय न झाल्याने एकही अर्ज दाखल होऊ शकला नाही. २९ सप्टेंबरला साप्ताहिक सुटीमुळे शासकीय कार्यालये बंदी होती. ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या दोन दिवसांत इच्छुकांनी अर्ज नेले. मात्र, पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात न आल्याने प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करू शकले नाहीत. उमेदवारी कोणाला मिळणार, केव्हा मिळणार या गोंधळाच्या स्थितीत चार दिवस हातातून निघून गेले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या हाती आता केवळ दोनच दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

- Advertisement -

शुक्रवार ४ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख असून जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता झुंबड उडणार आहे. काही मतदारसंघांत जागेबाबत अद्याप तोडगा निघू न शकल्याने इतर जागांवरील उमेदवारांना शिवसेना, भाजपने आपल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. मात्र, अद्यापही काही जागांबाबत एकमत होत नसल्याने नाशिकमध्येही बंडोबांनी पक्षाविरोधात निशाण फडकावले आहे. त्याचे पडसाद येत्या दोन दिवसांत बघायला मिळतील. दरम्यान ४ आणि ५ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मतदारसंघनिहाय विशेष पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन असून, निवडणूक विभागही सज्ज आहे. उमेदवार अर्ज दाखल करण्यास आल्यापासून ते प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतचे कामकाज सुलभतेने व्हावे यासाठी प्रशासनाचे नियोजन झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -