घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक मतदारसंघासाठी दोन मतदान यंत्र

नाशिक मतदारसंघासाठी दोन मतदान यंत्र

Subscribe

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माघारीनंतर १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे आता नाशिकसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्र (ईव्हीएम) लागणार आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माघारीनंतर १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे आता नाशिकसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्र (ईव्हीएम) लागणार आहेत. याकरता आवश्यक मतदान यंत्र उपलब्ध असून या मतदान यंत्राची सरमिसळ प्रक्रिया शनिवारी (दि.१३) दुपारी १२ ला अंबड येथील सेंट्रल वेअर हाउसमध्ये होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

नाशिकमध्ये १९०७ मतदान केंद्रे आहेत. याकरता २२२७ बॅलेट युनिट, २२२७ कंट्रोल युनिट, २४१८ कंट्रोल युनिटचे वाटप करण्यात आले आहे. एका मतदान यंत्रावर १६ नावे समाविष्ट होतात. यात १६ वा पर्याय हा नोटाचा असल्याने यापेक्षा अधिक उमेदवार असल्यास दोन मतदान यंत्रे लावावी लागतात. त्यानुसार नाशिकसाठी २२२७ अधिकची मतदान यंत्राची आवश्यकता भासणार असून सध्या प्रशासनाकडे सुमारे पाच हजार मतदान यंत्र उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अनेकवेळा एखाद्या उमेदवाराच्या नावापुढे मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशिनवर दूसर्‍या उमेदवाराचे नाव व चिन्ह येत असल्याबाबत तक्रारी येतात. याबाबत तक्रार आल्यास त्याची खातरजमा केली जाईल. तक्रारीत तथ्य आढळून न आल्यास तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र १९ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. माघारीनंतर खर्‍या अर्थाने आता उमेदवारांच्या प्रचारास प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्व उमेदवारांची बैठक घेण्यात येऊन त्यांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी दिंडारीेचे निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, श्रीनिवास अर्जुन, नितीन मुंडावरे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

चिन्हांचे वाटप

वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे विशाल शिरसाठ या दोघाही उमेदवारांनी कपबशी या चिन्हाची मागणी केली. याकरता एका शालेय विद्यार्थ्याकडून चिठठी काढून घेण्यात आली. त्यानुसार पवन पवार यांना कपबशी चिन्ह देण्यात आले. अपक्ष प्रियंका शिरोळे यांनी यज्ञकुंड, कलश, उगवता सूर्य या चिन्हांची मागणी केली मात्र आयोगाच्या यादीत हे चिन्हच नसल्याने त्यांना कपाट हे चिन्ह देण्यात आले.

अशी आहे निवडणूक तयारी

४,७२० – मतदान केंद्र
१८, ८२,०५१ – नाशिक लोकसभेतील मतदार संख्या
१७,२८,९७८ – दिंडोरी लोकसभा मतदार संख्या
६० – संवेदनशील मतदान केंद्र
२९,००० – कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त
६१ – सी विजील मार्फत दाखल तक्रारांचा निपटारा
४१,०२२ – लिटर मद्यसाठा जप्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -