घरमहाराष्ट्रनाशिक‘सिव्हिल’तर्फे ५४५० जणांना हिपॅटायटीसचे लसीकरण

‘सिव्हिल’तर्फे ५४५० जणांना हिपॅटायटीसचे लसीकरण

Subscribe

जागतिक हिपॅटायटीस दिनविशेष

हिपॅटायटीस बी हा कधीही बरा न होणारा आजार. हिपॅटायटीस विषाणू रोखण्याचा परिणामकारक उपाय लसीकरण आहे. या आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्हाभर शासकीय रुग्णालय, उपजिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयांमार्फत सोमवार (ता.२९) पासून मोफत लसीकरणासह जनजागृती केली जाणार आहे. हिपॅटायटीस बी लस जिल्हा रुग्णालयातर्फे बालकांना जन्मत: किंवा दीड, अडीच व साडेतीन महिन्यांचा असतानाच दिली जात आहे. जिल्हा रुग्णालयातर्फे जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये ५ हजार व जून २०१९ मध्ये ४५० जणांना हिपॅटायटीस बी लस मोफत देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार टीबी आणि एचआयव्हीच्या तुलनेत हिपॅटायटीस बीने १.३४ मिलियन लोकांचा मुत्यू झाला आहे. भारतातील अनेकजण एचबीव्ही पॉसिटिव्ह आहेत. जागरूकतेच्या अभावामुळे हिपॅटायटीसचे निदान होत नाही. परिणामी त्यावर उपचारदेखील मिळत नाही. हिपॅटायटीस विषाणूचे ए ते ई असे पाच प्रकार आहेत. हिपॅटायटीस ए आणि बी हे मुख्य प्रकार आहेत. हिपॅटायटीस ए दूषित पाण्यामुळे होतो तर हिपॅटायटीस बी रक्ताच्या संक्रमनातून होतो. हिपॅटायटीस ए चे विषाणू मानवी विष्टेत असतात. ती विष्टा पावसाळ्यात पाणी वाहत ओढ्यात, विहिरीतील पाण्यात मिश्रित होते. ते पाणी पिण्यात आल्यास त्यातून हिपॅटायटीस ए होतो. या आजाराचे रूग्ण उपचाराने बरा होतो. हिपॅटायटीस बी रक्ताच्या संक्रमणातून मानवास होतो. या आजाराचे विषाणू मानवी शरीरात यकृतात जातात. या आजाराची लक्षणे वाढतात तसे यकृतातील पेशी नष्ट होतात. त्यातून रूग्णाचा मृत्यू होतो.

- Advertisement -

डायलिसीस व रक्ताच्या संपर्कातून हिपॅटायटीस बी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना होऊ नये, यासाठी शासनामार्फत रूग्णालयातील वर्ग एक ते वर्ग चारच्या कर्मचार्‍यांना ही लस दिली जात आहे.

हिपॅटायटीस लस कोणी घ्यावी?

ज्यांना रक्ताची किंवा ब्लड प्रॉडक्टसची वारंवार गरज भासते, डायलिसिस रूग्ण, अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती. ड्रग्स घेणार्‍या व्यक्ती. अनेकांबरोबर लैंगिक संबंध असणार्‍या व्यक्तीने. हेल्थकेयर वर्कर्स आणि इतरांच्या रक्ताशी आणि ब्लड प्रॉडक्टसशी संबंध येणार्‍या सगळ्या व्यक्ती. हिपॅटायटीस बी च्या लसी पूर्ण न केलेल्या व्यक्ती.

- Advertisement -

अशी घ्या काळजी

प्रत्येक वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. गढूळ व अस्वच्छ पाणी गाळून स्वच्छ करत उकळून प्यावे. पाणी शुध्दीकरणासाठी मेडीकोअरचा एक थेंब पाण्यात टाकावा. नागरिकांनी उघड्यावर शौचेला जावू नये. शौचालयाचे पाणी नदीनाल्यात सोडू नये. नियमित हात स्वच्छ धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी पाणी स्वच्छतेसाठी ग्रामपंचायत, नगरपालिक व महापालिकेने पाणीपुरवठा शुद्ध करावा. त्यासाठी पाण्याची पाण्याची नियमित तपासणी करावी, पाण्यात बेल्चिग पावडर टाकावी. रक्ताच्या संक्रमनात न येण्यासाठी इतरांशी शारीरिक संबंध टाळावेत.– डॉ. सुरेश जगदाळे जिल्हा शल्य चिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -