घरमहाराष्ट्रनाशिक४१ टँकरद्वारे भागतेय १ लाख नागरिकांची तृष्णा

४१ टँकरद्वारे भागतेय १ लाख नागरिकांची तृष्णा

Subscribe

येवला, पेठ तालुक्यांत सर्वाधिक टँकर सुरू

पावसाळा सुरू होऊनही जिल्हयातील ८ तालुक्यातील १ लाख नागरिकांची तहान टँकरव्दारे भागवली जात आहे. यात सर्वाधिक टँकर येवला, पेठ आणि बागलाण तालुक्यांत सुरू आहे. सद्यस्थितीत ५८ गावे, २६ वाड्या अशा ८४ गावांना पाणीपुरवठा केला जात असून टँकरच्या १०० फेर्‍या मंजूर करण्यात आल्या आहेत.

मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तुलनेने कमी आहे. नेहमीचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होते. टँकरद्वारे ग्रामीण भागातील वस्त्या व वाडयांमध्ये पाणी पुरवठ्याला सुरुवात होते. यंदा एप्रिल अखेर पर्यंत टँकरची मागणी कमी होती. पण हळूहळू तापमानाचा पारा चढत गेला तसतशी टँकरची मागणी वाढू लागली. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा टंचाईच्या झळा बसणार नाही अशी शक्यता वर्तविली जात होती. जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार बॅटींग केल्याने सर्वचजण सुखावले. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा एकदा उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. आजमितीस जिल्ह्यातील धरणांत २६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची झळ ही येवला तालुक्याला बसत आहे. या ठिकाणी १७ गावे व १३ वाड्यांना १० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. त्या खालोखाल अतिवृष्टी अशी ओळख असलेल्या पेठ तालुक्यात ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बागलाण, चांदवड, देवळा, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा या तालुक्यांतील १ लाख ६३१ नागरिकांची तहान टँकरव्दारे भागवली जात आहे.

- Advertisement -

५८ गावे, २६ वाड्या अशा ८४ गावांना पाणीपुरवठा

तालुका            टँकर
बागलाण           ६
चांदवड             ५
देवळा               २
मालेगाव            ५
नांदगाव             १
पेठ                  ७
सुरगाणा            ५
येवला               १०

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -