घरक्राइमचिठ्ठी लिहून वायरमनची आत्महत्या

चिठ्ठी लिहून वायरमनची आत्महत्या

Subscribe

बायकोला नोकरी देण्याची विनंती

नाशिक : कर्जबाजारीपणाला कंटाळून दाम्पत्याने गळफास घेतल्याची घटना ताजी असताना भांडणाला कंटाळून वायरमनने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२०) दुपारी २.३० वाजेदरम्यान अंबडमध्ये घडली. पोलिसांना घटनास्थळी चिठ्ठी सापडली असून, त्यामध्ये त्याने बायकोला नोकरी द्या, असा उल्लेख केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. निलेश दगा धामणे (वय ३६, रा. नाशिक) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश धामणे हे सातपूरमधील महावितरणचे कामकाज करतात. त्यांनी मंगळवारी आपण काही खात नाही आणि कोणाला खाऊ देत नाही, असे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठेवले होते. ते भांडणामुळे ताणतणावात होते. त्यांनी मंगळवारी शिवम पार्क परिसरातील चर्चमागे गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -