घरमहाराष्ट्रनाशिकमुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय

मुंबईत उभारणार जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय

Subscribe

मुंबईत जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय साकारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (ता. ३१ मे) नाशिकमध्ये केली.

गेल्या साडेचार वर्षात वनविभागाने वृक्ष लागवडीप्रमाणेच वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याचप्रमाणे आता मुंबईत जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय साकारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (ता. ३१ मे) नाशिकमध्ये केली. वनविभागाची १६ वी राष्ट्रीय वन परिषद मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वनविभगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या परिषदेप्रसंगी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात माळढोक, गिधाड, चिऊताई यांसह पक्षांच्या संवर्धनासाठी विशेष योजना करण्याचे प्रस्तावित असल्याचे ते म्हणाले. याशिवाय मुंबईमध्ये आरे कॉलनीतील १९० एकरच्या जागेवर मुंबई महापालिका आणि वनविभागाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे असे प्राणिसंग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे केवळ प्राणीसंग्रहालय नसून वन्यजीवांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, वन्यजीवप्रेमींसाठी हे एक विद्यापीठच असणार आहे. या संग्रहालयात रिसर्च सेंटरही उभारण्यात येणार आहे. वन्यजीवांचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकांसाठी हे एक केंद्र असेल शिवाय पर्यटकांसाठीही हे एक उत्तम ठिकाण म्हणून आम्ही विकसित करणार आहोत, लवकरच याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनमंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर १३२ कलमी कार्यक्रम तयार केला आहे.

- Advertisement -

विश्वासार्हता, पारदर्शकता आणि लोकसहभागांच्या जोरावर ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. केवळ वन विभागच नव्हे तर विविध ३५ विभागांचा सहभाग या मोहिमेत असणार आहे. वृक्ष लागवड करणे एवढेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य नसून वृक्ष लागवडीच्या मानसिकतेचे बिजारोपण करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट्य असल्याचे ते म्हणाले. मात्र, अनेकदा याकडे एक इव्हेंट म्हणून पाहिले जाते. परंतु आता आम्ही जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी टोल फ्री क्रमांक तयार करण्याचा आला आहे. सर्व शासकीय यंत्रणेने हे काम ‘मिशन मोड’ स्वरूपात म्हणजेच मोहीम समजून हाती घ्यावे. ‘शासकीय यंत्रणेबरोबरच या वृक्षलागवडीच्या कामात व्यापक लोकसहभाग महत्त्वाचा असून, या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप यावे यासाठी अधिकार्‍यांनी प्रयत्न करावे असेही ते म्हणाले. यावेळी प्रत्येक जिल्हानिहाय वनविभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.

वाघांची संख्या वाढली

सन २०१४ मध्ये महाराष्ट्रात २०४ वाघ होते. मात्र, गेल्या चार वर्षांत यात २५ टक्के वाढ झाली असून आज वाघांची संख्या २५० झाली आहे. तर दोन वर्षाच्या आतील बछड्यांची संख्या १०१ झाली आहे. वन्य प्राण्यांचे संवर्धन व्हावे याकरीता वनविगाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

जलयुक्तला वनयुक्तची जोड

जलयुक्त अभियानाच्या धर्तीवर राज्यातील ४९३ गावे वनयुक्त गावे म्हणून तयार करण्यात येणार आहे. या गावांमध्ये जलयुक्तबरोबरच १५६ वृक्षांच्या प्रजातींपैकी अधिकाधिक वृक्षांची लागवड करावी, या गावांमध्ये ग्रीन आर्मीची संख्या सर्वाधिक असावी आदी निकष टाकण्यात येणार आहे. जलस्तर उंचावण्यासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरल्यानंतर जलयुक्तला वनयुक्तची जोड देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

अन्यथा तुरूंगवास

अनेकदा शासनाच्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागते. मात्र, तोडलेल्या वृक्षाच्या बदल्यात पाचपट वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अनेकदा या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे याकरीता एक समिती नियुक्ती करून अशा प्रकल्पांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे संबंधित ठेेकेदाराने तोडलेल्या वृक्षाच्या बदल्यात वृक्ष न लावल्यास दंडात्मक कारवाई किंवा थेट तुरूंगवासाची शिक्षाही प्रस्तावित करावी याकरीता आम्ही विचार करत असल्याचे ते म्हणाले.

बैठकीतील ठळक मुद्दे

  • वनविभागाने राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा वनधनुष्य घेतलाय
  • टेक्नॉलॉजीचा वापर करून लागवड केलेल्या वृक्षांना मॉनिटर केले जातेय
  • राज्यात ६१ लाख ८१ हजार ७६५ लोकांची ग्रीन आर्मी
  • ग्रीन आर्मीचेही १ कोटींचे उद्दिष्ट्य
  • राज्यात ट्रान्झिट पासमुक्त बांबू पोर्ट
  • बांबूपासून रोजगारनिर्मितीला प्राधान्य
  • समुद्र किनारपट्टीवर तीवर जंगलात ५० टक्के वाढ
  • जंगलवाढीसाठी देशात, महाराष्ट्र अव्वल
  • जगातील सगळ्यात मोठे प्राणिसंग्रहालय, १९० किलोमीटर
  • जनावरांसाठी, जंगलात सोलरवर आधारित पाणवठेनिर्मिती
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -