घरमहाराष्ट्रनाशिकबैलांच्या झुंजीत युवक जखमी

बैलांच्या झुंजीत युवक जखमी

Subscribe

झुंज सोडवणे एका युवकाला चांगलेच महागात पडले

नाशिक : नाशिक मधील चांदवड येथे शेतात दोन बैलांमध्ये सुरु असलेल्या झुंज सोडवणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. या झुंजीत युवक गंभीर जखमी झाला आहे. किरण सदू गोधडे (वय 35, राजदेरवाडी, ता. चांदवड) असे जखमी युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरण सदू गोधडे हे शेतात असताना आपल्या शेतातील व शेजारच्या बैलांची झुंज सुरु होत्या. ते बैलांची झुंज सोडविण्यासाठी गेले असता त्यांना बैलाच्या शिंगाणे मार लागला. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -