घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या पुरवठा विभागाचे नियोजन, जिल्ह्याला ६० हजार मेट्रीक टन धान्यसाठ्याची आवश्यकता

नाशिकच्या पुरवठा विभागाचे नियोजन, जिल्ह्याला ६० हजार मेट्रीक टन धान्यसाठ्याची आवश्यकता

Subscribe

लॉकडाऊनमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्यास शासनाने सुरूवात केली आहे. नाशिकमध्येदेखील रेशन दुकानांतून धान्य वितरण सुरू झाले आहे.

लॉकडाऊनमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्यास शासनाने सुरूवात केली आहे. नाशिकमध्येदेखील रेशन दुकानांतून धान्य वितरण सुरू झाले आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, सर्वांना धान्य दिले जाईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे ४० हजार लाभार्थ्यांना धान्य देण्यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन केले जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी सांगितले.

लॉकडाऊनचा कालावधी १५ एप्रिलपर्यंत असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी द्यायला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील २६०० स्वस्त धान्य दुकानांतून धान्य वितरणाला सुरूवातही झाली आहे. या दुकानांतून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांची चलने भरून घेण्यात येत आहेत. या चलनाच्या आधारावर तिप्पट अन्नधान्य वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीओएस मशीनवरदेखील १ एप्रिलपासून एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे अन्नधान्य एकत्रित नियमन केले आहे. जिल्ह्यासाठी दरमहिन्याला १३ हजार मेट्रीक टन गहू आणि ७ हजार मेट्रीक टन तांदूळ अशा एकूण २० हजार मेट्रीक टन धान्यसाठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे तीन महिन्यांचा विचार करता ६० हजार मेट्रीक टन धान्यसाठा लागणार आहे. त्यादृष्टीने पुरवठा विभागाकडून नियोजन सुरू आहे.

- Advertisement -

प्रत्येक लाभार्थ्याला धान्य देण्यात येईल. कुणीही दुकानांमध्ये गर्दी करू नये. आपल्याकडे धान्याचा पुरेसा साठा आहे. मार्च महिन्याची ४० टक्के धान्य उचल करण्यात आली आहे. तसेच, पुढील दोन महिन्यांचे धान्यही रेशन दुकानदारांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
– अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

४० लाख लाभार्थी

जिल्ह्यात प्राधान्य कुटुंबाचे ७ लाख ६२ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. यात प्रत्येक कुटुंबात चार याप्रमाणे सुमारे ३० लाख ४८ हजार व्यक्ती आहेत. तर, अंत्योदय योजनेंतर्गत ४ लाख ६० हजार लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय लाभार्थी असे एकूण ३५ लाख ८ हजार लाभार्थी आहेत. या सर्व लाभार्थ्यांना धान्य मिळणार आहे.

- Advertisement -

१०५ किलो धान्य मिळणार

अंत्योदय गटात दर महिन्याला २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ असे एकूण ३५ किलो धान्य दिले जाते. आता तीन महिन्यांचे १०५ किलो धान्य दिले जाणार आहे. प्राधान्य गटाला ३ किलो गहू आणि २ किलो तांदुळ असे एकूण १५ किलो धान्य दिले जाते. या लाभार्थ्यांना तीन महिन्यांचे १५ किलो धान्य मिळणार आहे. दोन रूपये किलोप्रमाणे गहू आणि तीन रूपये किलो तांदूळ या दराने धान्य देण्यात येत असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -