घरमहाराष्ट्रनक्षलवाद्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळला

नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळला

Subscribe

गडचिरोलीमध्ये मोठ्या घातपाताचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. धानोरा तालुक्यात चातगाव-कोटेझरी मार्गावरील पुलाखाली पेरून ठेवलेली स्फोटकं शोधण्यात पोलिसांना यश आले. सुमारे तीन-चार किलो ऐवढी होती स्फोटके होती. एक वाहन उडवण्याची क्षमता असलेली ही स्फोटके सकाळी पोलिसांनी शोधली काढली आणि जंगलात निकामी केली. मोठा घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. विशेष म्हणजे घटनास्थळ चारगाव पोलीस ठाण्यापासून जवळ आहे. पोलिसांनी सतर्कता बाळगत घातपाताचा कट उधळला आहे.

चातगाव-कटेझरी मार्गावरील पुलाखाली नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. याचा माहिती पोलिसांना मिळाली त्याच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्फोटकांचा शोध घेतला. नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली स्फोटकं शोधू काढण्यात पोलिसांना यश आले आणि त्यांनी ही स्फोटकं नष्ट केली. एक वाहन उडवण्याची क्षमता या स्फोटकांमध्ये असल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या तोंडावर नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या प्रयत्नात आहेत. पोलिसांनी नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली स्फोटकं शोधऊन काढली. बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेत. स्फोटकं जंगलात नेऊन ती निकामी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -