मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, शरद पवांराची स्पष्टोक्ती

Sharad Pawar and Prashant Kishor

मी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असलेले वृत्त खोटे आणि निराधार असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे. अशा पदासाठीच्या निवडणूकीचा काय निकाल असे हे मला माहितेय, ज्याअर्थी एखाद्या पक्षाकडे ३०० खासदार आहेत, अशावेळी वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या दोन बैठकांबाबतचे कारणही शरद पवार यांनी सांगितले.

शरद पवार – प्रशांत किशोर भेट

प्रशांत किशोर हे मला दोन वेळा भेटले. पण या भेटीदरम्यान प्रशांत किशोर यांनी आपण राजकीय क्षेत्र सोडत असल्याची माहिती दिली. राजकीय क्षेत्रातील पोल स्ट्रॅटेजी करण्याचे काम मी सोडणार आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळेच २०२४ च्या निवडणूकांच्या निमित्ताने कोणतीही चर्चा या भेटी दरम्यान झाली नाही. या निवडणूकीसाठी काहीच ठरले नसल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय समीकरणे ही नेहमीच बदलत असतात. त्यामुळेच येत्या २०२४ च्या निवडणूकीत कोणतेही नेतृत्व स्विकारण्याबाबत मी काहीच निश्चित केले नसल्याचेही ते म्हणाले. प्रशांत किशोर यांनी दोनवेळा भेट घेतली. या भेटीत त्यांनी नव्याने सुरू करत असलेल्या कंपनीबाबतची माहिती दिली. पण २०२४ निवडणूकीच्या निमित्ताने कोणतीही चर्चा झाली नसल्याचा खुलासा शरद पवार यांनी केला.