Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र काय सांगताय! तुरुंगातील कैद्यांना मिळणार चक्क झणझणीत चिकन आणि मटण

काय सांगताय! तुरुंगातील कैद्यांना मिळणार चक्क झणझणीत चिकन आणि मटण

पुण्यामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी यासंदर्भात संपुर्म माहिती दिली आहे.

Related Story

- Advertisement -

सामान्य माणूस दिवसरात्र काबाड कष्ट तसेच काटकसर करून महिन्यातून एकदा तरी चमचमीत खायाला मिळावे यासाठी धडपड करताना दिसतो. आपल्या पोराबाळांना दोन वेळचं अन्न पाणी व्यवस्थीत सोय होईल का? असं विचार करून प्रत्येक व्यक्ती प्रामाणीक पणाने स्वत:चं आयुष्य जगत आहे. मात्र एखादा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला मात्र तुरुंगात पचं पक्वान्नांंचा बेत मिळणार आहे. हे ऐकल्यावर तुमचं डोक देखील चक्रावून जाईल. तुम्ही म्हणाल हे अशक्य आहे. पण ही बातमी खरी असल्याचे समोर येत आहे. आता तुरुंगात खडी फोडणाऱ्या कैद्यांना चमचमीत मटणाचा स्वाद घेता येणार आहे. महाराष्ट्रातील तुरुंगांमध्ये आता कैद्यांना चिकन, मटणपासून ते मिठाई, ड्रायफ्रूट्स,श्रीखंड इत्यादी स्वादिष्ट पदार्थांचा अस्वाद घेता येणार आहे.(now Prisoners will now get spicy chicken and mutton in their meals)

पुण्यामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक (तुरुंग) सुनील रामानंद यांनी यासंदर्भात संपुर्म माहिती दिली आहे.तुरुंगातील कैद्यांसाठीच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या मूलभूत गरजेच्या वस्तूंसोबतच इतर अनेक वस्तूंची वाढ करण्यात आली आहे. अशा एकूण 30 गोष्टी या कँटीनमध्ये मिळणार असून त्याची यादीच महासंचालकांनी जाहीर केली आहे. पण हे पदार्थ खाण्यासाठी कैद्यांना स्वत:च्या खिशातील पौसे मोजावे लागणार असल्याचे देखील महासंचालकांनी पत्रकार परिषदे दरम्यान स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

कैद्यांना मिळणार हे पदार्थ
फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ, ड्राय फ्रुट्स, सीझनल फ्रुट्स, दही, पनीर, लस्सी, सरबत, हवाबंद मांसाहारी पदार्थ, कचोरी, चिकन, मासे, शिरा, लाडू, चिवडा, शंकरपाळी, चकली, करंजी, श्रीखंड, आम्रखंड, शेव, पापडी, लोणचे, सामोसा, च्यवनप्राश, म्हैसूरपाक, जिलेबी, पेढे, चहा, कॉफी, फेस वॉश, टर्मरिक क्रीम, एनर्जी बार, ग्लुकॉन डी, अंघोळीचे साबण, अगरबत्ती, बूट पोलिश, ग्रीटिंग कार्ड, मिक्स व्हेज, अंडा करी, वडा पाव, कॉर्नफ्लेक्स, बोर्नव्हिटा, चॉकलेट, उकडलेली अंडी, पनीर मसाला, पुरणपोळी, आवळा, कॅण्डी, मुरांबा, गुलाबजामून, आंबा, पेरू, बदाम शेक, ताक, दूध, गूळ, गाईचे शुद्ध तूप, बटर, खिचडी, डिंक लाडू, बेसन लाडू, आले पाक, बटाटा भजी.हे हि वाचा – महागाई, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार, हँगिंग गार्डनपासून सायकल रॅली- Advertisement -

 

- Advertisement -