घरताज्या घडामोडीSushant Singh CBI Probe: दाभोळकर २०१४ मध्ये CBI कडे दिले, त्याचे काय...

Sushant Singh CBI Probe: दाभोळकर २०१४ मध्ये CBI कडे दिले, त्याचे काय झाले? – शरद पवार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात त्याच्या कुटुंबियांनी बिहार येथे दाखल केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत होते. याबद्दल सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता कोर्टाने हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मात्र हे करत असताना त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणाची आठवण करुन दिली. २०१४ साली हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले होते, मात्र अद्यापही या प्रकरणाचे निराकरण होऊ शकले नसल्याची टीका शरद पवार यांनी केली.

- Advertisement -

काल सकाळी सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. मात्र आज सकाळी शरद पवार यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली. पवार म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास #CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.”

तसेच आणखी एक ट्विट करुन शरद पवारांनी दाभोलकर प्रकरणाची आठवण करुन दिली आहे. २०१३ साली आजच्या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. २०१४ साली हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र अद्याप हे प्रकरण निकाली निघालेले नाही. याच प्रकरणावरुन शरद पवारांनी सीबीआयवर निशाणा साधत “दाभोलकर प्रकरणाची परिणती सुशांत सिंह प्रकरणात होणार नाही.”, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

- Advertisement -

दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्ष पुर्ण होत आहेत. यानिमित्त शरद पवार यांनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -