घरमहाराष्ट्रमाजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्येप्रकरणी ८ जणांना जन्मठेप

माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्येप्रकरणी ८ जणांना जन्मठेप

Subscribe

२०१२ च्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी हत्याप्रकरणातील आरोपींना अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सिरीयल किलर इम्रान मेंहदीसह ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने सिरीयल किलर इम्रान मेहंदीसह ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत ८ लाखांचा दंड देखील सुनावला आहे. ५ मार्च २०१२ रोजी सलीम कुरेश यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली होती.

६ वर्षानंतर आरोपींना शिक्षा

औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने आज मोठी सुनावणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि रॉक्सी सिनेमाचे मालक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी सिरीयल किलर इम्रान मेंहदीसह ८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ६ वर्षानंतर याप्रकरणाचा निकाल लागला असून न्यायालयाने आरोपींना जन्मठेप सुनावली. आज या सुनावणीमुळे जिल्हा सत्र न्यायालय परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

अशी घडली होती घटना

५ मार्च २०१२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि रॉक्सी थिएटरचे मालक सलीम कुरेशी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. रॉक्सी थिएटरमधून सलीम कुरेशी घरी जात असताना त्यांचे कारसह अहरण करण्यात आले होते. बेगमपुरा पोलीस ठाण्यात सलीम कुरेशी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करम्यात आला होता. दोन दिवसानंतर सलीम यांची कार सिल्लेखान्यातील रस्तायवर टाकून आरोपी फरार झाले होते. याप्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुर करत आरोपी इम्रान मेहंदी याला अटक केली. त्यानंतर याप्रकरणाचा उलघडा झाला आणि पोलिासंनी इतर सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

इम्रान मेहंदीसह ८ जणांना जन्मठेप

सलीम कुरेशी हत्या प्रकरणी पोलिसांनी सिरीयल किलर इम्रान मेहंदी यांच्यासह ८ आरोपींविरोधात मोक्का लावला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाता सखोल तपास करुन औरंगाबाद सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज याप्रकरणाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही पाटील यांच्यासमोर झाली. यावेळी न्यायालयाने आरोपी इम्रान मेहंदीसह आठ आरोपींवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -