घरताज्या घडामोडीसत्तारांचे जो कपडे फाडेल त्यांना मी 10 लाखांचे बक्षीस देईन; राष्ट्रवादीच्या नेत्याची...

सत्तारांचे जो कपडे फाडेल त्यांना मी 10 लाखांचे बक्षीस देईन; राष्ट्रवादीच्या नेत्याची ऑफर

Subscribe

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडेल, त्यांना मी 10 लाखांचे बक्षीस देईन, अशी ऑफर राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याने दिली आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द काढले.

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडेल, त्यांना मी 10 लाखांचे बक्षीस देईन, अशी ऑफर राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याने दिली आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द काढले. सत्तारांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सत्तारांचा निषेध केला. (Ncp Leader Appeals I Will Give A Reward Of 10 Lakhs To Anyone Who Tears Abdul Sattar Clothes)

या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफीही मागितली. पण अब्दुल सत्तारांच्या माफीनंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधातील आंदोलन कायम सुरू ठेवले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रेखा तौर यांनी “कृषिमंत्री अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथं कुठं दौऱ्यावर असतील तिथं जावून कार्यकर्त्यांनी त्यांचे कपडे फाडावेत. त्याचे कपडे फाडणाऱ्याला मी स्वतः 10 लाख रुपयांचे बक्षीस देईन”, असे आवाहन केले.

- Advertisement -

“अब्दुल सत्तारांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. त्यांनी सुप्रिया ताईंचाच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व महिलांचा अपमान केला आहे. अब्दुल सत्तार, तुला मी सांगू इच्छिते, सुप्रिया ताईंजवळ एवढं आहे की त्या तुझ्या सात पिढ्या विकत घेऊ शकतील. पन्नास खोके, एकदम ओके. शिंदे गटाने पन्नास खोके घेऊन सरकार ओरबाडून आणली आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मी विनंती करते की, ते जिथे कुठे दौऱ्यावर असतील, त्याचे कपडे फाडा. जे कुणी अब्दुल सत्तारांचे कपडे फाडेल, त्याला मी 10 लाख रुपये बक्षीस देईल. अब्दुल सत्तार तुझी दिलगिरी आणि माफी नको. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की, महिलांचा अपमान करणाऱ्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा असंही त्या म्हणाल्या आहेत”, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशच्या उपाध्यक्ष रेखा तौर यांनी म्हटले.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. केवळ माफी मागून चालणार नाही तर अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या सुरक्षा रक्षकाकडून भाई जगतापांना धक्काबुक्की

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -