संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा, ईडीची याचिकाही कोर्टाने फेटाळली

sanjay raut saamana rokthok on veer savarkar rahul gandhi bjp rss

मुंबई – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले खासदार संजय राऊतांच्या (MP Sanjay Raut) सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. संजय राऊतांच्या जामीनावर स्थगिती देण्याची ईडीची (ED) मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे संजय केव्हाही तुरुंगाबाहेर येऊ शकतील.

हेही वाचा – पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊतांना जामीन मंजूर

कथित पत्राटाळ जमीन घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून संजय राऊत तुरुंगात आहेत. अटक केल्यानंतर संजय राऊत यांना सुरुवातीला ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अटकेनंतर संजय राऊत आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत.

याप्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकिलांनी केला. परंतु, ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीत संजय राऊत यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पंरतु, या जामीनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावल्याने संजय राऊत यांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या काही मिनिटातंच संजय राऊत तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.

शिवसेना भवनात जल्लोष साजरा करणार

जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. या जामीनानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच आज संध्याकाळी पाच वाजता शिवसेनाभवन येथे जल्लोष साजरा करण्यात येणार आहे.