घरमहाराष्ट्रगाडी पळवताय सावधान! समृद्धी महामार्गावर 'या' कारणामुळे अपघातांना निमंत्रण

गाडी पळवताय सावधान! समृद्धी महामार्गावर ‘या’ कारणामुळे अपघातांना निमंत्रण

Subscribe

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा राज्याला समृद्ध करणारा महामार्ग मानला जात आहे. हा महामार्ग राज्याला विकासाकडे नेण्यासाठी महत्त्चाचा ठरेल असे राज्य सरकारचे मत आहे. मुंबई ते नागपूर असा हा मार्ग असून सध्या शिर्डीपासून नागपूरपर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. मोठ्या दिमाखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मात्र हा मार्ग वाहनधारकांना किती सुरक्षित आहे त्याबाबत विविध चर्चा ऐकायला मिळत आहेत.

समृद्धी महामार्गावर वेगाने वाहन चालवल्यास टायर फूटू शकतो असे काही तज्ज्ञमंडळींचे मत आहे. समृद्धी महामार्गावर प्रत्येक प्रवाशाला गाडी वेगाने चालवण्याचा मोह आवरता येणार आहे. लोकार्पण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल १२०० वाहनांनी या मार्गाने प्रवास केला आहे. तर दोन ठिकाणी अपघातसुद्धा झाले आहेत. या अपघातामध्ये कोणाचाही जीव गेला नसला तरी दोन जनावरे दगावली आहेत.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर सध्या कोणत्याही प्रकारे सरकारचे निर्बंध नसल्यामुळे काही गैर प्रकार घडत आहे. यामध्ये काही वाहनधारक वेगवान गाडी चालवत आहेत. मात्र हा वेगवान प्रवास जीवावर बेतू शकतो. वेगात वाहन चालवल्यास टायर फुटण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवास सुरू करण्यापूर्वी टायरची तपासणी जरुर करुन घ्यावी असा सल्ला ऑटोमोबाइल तज्ज्ञ देत आहेत. यामुळे समृद्धी महामार्गावर टायर फुटीमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचे म्हटले जात आहे.

समृद्धी महामार्ग हा सिमेंटच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. ८०० किलोमीटरचा मार्ग असून यामध्ये सर्वाधिक बांधकाम सिमेंटमध्ये करण्यात आले आहे. विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर हा महामार्ग करताना केला आहे. डांबरीकरणाचा रस्ता नसल्यामुळे टायर फुटण्याची शक्यता असल्याची माहिती ऑटोमोबाइल तज्ज्ञ निखील उंबरकर यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

- Advertisement -

कशी घ्याल वाहनांची काळजी

प्रत्येक वाहनधारक लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या वाहनात हवा आणि पेट्रोल व डिझेल भरत असतात. टायरमधील हवेत नायट्रोजन ७८ टक्के असते, ऑक्सिजन २१ टक्के तर इतर वायूचे प्रमाण १ टक्के एवढं असते. प्रत्येक टायरच्या क्षमतेनुसार हवा भरली जाते. ३२ ते ३३ बार एवढी हवा भरण्यात येते. जर वाहन कुठेही थांबा न घेता चावले तर त्यातील हवा एक्सपॉंड होण्याची शक्यता असते. ३२ बार असलेली हवा ४५ ते ५० पर्यंत पोहोचते. यामुळे टायरचा स्फोट होऊन मोठा अपघात होऊ शकतो. यामुळे तज्ज्ञ नेहमी नायट्रोजन हवा भरण्याचा सल्ला देतात.

लांबचा प्रवास करताना टायर आणि टायरचे साइड वॉल चेक करणं गरजेचे आहे. गाडीची अलायमेंट चेक करुन घ्यावी. न थांबता गाडी चालवू नये यामुळे टायर आणि इंजिनवर गंभीर परिणार होणार नाही. प्रत्येक १०० ते १५० किलोमीटर वाहन चालवण्यास थोडी विश्रांती घ्यावी.

उन्हाळ्यात वाहनाची काळजी घ्या

सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरणात गारवा आहे. यामुळे रस्त्याचे तापमानसुद्धा कमी राहते. परंतु उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाने रस्त्याचे तापमान प्रचंड वाढते. यात जर वाहनांचा वेग वाढवला तर टायर फुटण्याची शक्यता आहे.

छोट्या वाहनांनी वेगाशी स्पर्धा टाळावी

अवजड वाहनाच्या तुलनेत छोट्या वाहनांनी वेगाशी स्पर्धा करण्याचे धाडस करु नये. ज्या वाहनांचे चाक लहान त्या वाहनाची चाके फुटण्याची शक्यात सर्वाधिक आहे. तर इनोव्हा, फॉर्च्युनर, बीएमडब्लू आणि मर्सिडीजसारख्या वाहनांचे चाकं मोठी असतात, या वाहनांचा वेग १२० पर्यंतच ठेवावा. या पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्यास टायर फुटून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे दरवेळी प्रवासाला निघताना आपल्या वाहनाचे टायर तपासून घ्यावेत असा सल्ला ऑटोमोबाइल तज्ज्ञ देतात.


मेहरौली, गुरुग्राम जंगलात सापडलेली हाडं श्रद्धाचीच; वडिलांशी जुळला हाडांचा DNA


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -