घरताज्या घडामोडी'...त्याचे परिणाम महाराष्ट्रभर भोगावे लागतील', 'बारसू'वरून आव्हाडांचा सरकारला इशारा

‘…त्याचे परिणाम महाराष्ट्रभर भोगावे लागतील’, ‘बारसू’वरून आव्हाडांचा सरकारला इशारा

Subscribe

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू या ठिकाणी रिफायनरी विरोधात ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन केलं जातंय. यावेळी काही महिलांना अटक देखील करण्यात आली होती. महिलांच्या या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला इशारा दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू या ठिकाणी रिफायनरी विरोधात ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन केलं जातंय. यावेळी काही महिलांना अटक देखील करण्यात आली होती. महिलांच्या या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला इशारा दिला आहे. तसेच, ‘या सरकारने काल तेथील जवळपास 100 ते 150 महिलांना उचलून गाडीत ठेवले. त्यांना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची सैर केली आणि रात्री 12 वाजता कोर्टात नेले. महिला भगिनींच्या बाबतीत इतका अमानुष प्रकार यापूर्वी महाराष्ट्रात कुठेही झालेला नव्हता’, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीप्रकरणी सरकारला इशार दिला आहे. “बारसु सोलगाव येथील परिस्थिती पाहता चर्चेनी तेथील उग्रता कमी करायला हवी असं पवार साहेबांचे म्हणणे आहे. या सरकारने काल तेथील जवळपास 100 ते 150 महिलांना उचलून गाडीत ठेवले. त्यांना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची सैर केली आणि रात्री 12 वाजता कोर्टात नेले. महिला भगिनींच्या बाबतीत इतका अमानुष प्रकार यापूर्वी महाराष्ट्रात कुठेही झालेला नव्हता”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisement -

“तुम्ही हजारोंची पोलीस फोर्स लावून एखादा प्रकल्प राबवायचा प्रयत्न केलात तर त्याची उलट प्रक्रिया पूर्ण राज्यभर उठेल. सर्व ग्रामपंचायतीनी विरोध केला आहे असं ग्रामपंचायत च्या सर्व लोकांचे म्हणणे आहे. जर हे सत्य असेल तर जो प्रकल्प स्थानिकांना, गावकऱ्यांना नको आहे. तो आपण त्यांच्या वर लादूच शकत नाही. त्यामुळे हे जे काही चालू आहे हे लोकशाही राज्याला धरून नाही. हुकूमशाही पद्धतीने राज्यव्यवस्था चालवता येणार नाही आणि पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करणं हे राज्य सरकारला शोभत नाही त्याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्र भर भोगावे लागतील”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“कमीत कमी महिला आंदोलकांशी कस वागावं याचा तरी माणुसकीच्या दृष्टीने विचार करायला हवा. बारसु सोलगावच्या लोकांशी चर्चा करावी. अशी सगळ्यांची मागणी आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे”, असेही आव्हाडांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ११ जवानांना वीरमरण आल्याचे समजून धक्का बसला; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -