घरमहाराष्ट्रपुणेPune Water Cut : पुण्यातील पाणीकपात तूर्तास टळली, 15 मेनंतर होणार निर्णय

Pune Water Cut : पुण्यातील पाणीकपात तूर्तास टळली, 15 मेनंतर होणार निर्णय

Subscribe

पुण्यात करण्यात येणारी पाणी कपात सध्या तरी न घेण्याचा निर्णय करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय 15 मेनंतर करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे.

धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक नसल्याने राज्यातील अनेक शहरांमध्ये पाणी कपात करण्यात येत आहे. मुंबईसारख्या शहरात सुद्धा काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी सोडण्यात येत आहे. पण पुणेकरांसाठी मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणेकरांच्या डोक्यावर असलेली पाणी कपातीची तलवार तूर्तास तरी टळली आहे. पुणे ग्रामीण आणि पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणात जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीपुरवठा शिल्लक आहे. त्यामुळे पुण्यामध्ये पाणी कपात करण्यात येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण याबाबत 15 मेनंतर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संपूर्ण आढावा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे शहरात पाणी कपात करायची की नाही, यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला पुण्यातील आमदारांनी हजेरी लावली होती. या बैठकीमध्ये पुण्यातील पाण्यावर संबंधित काही विषयांवर चर्चा करण्यात आली. पुणे शहराला आणि ग्रामीण भागाता जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या जिल्ह्यातील चार धरणांमध्ये शिल्लक आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या चारही धरणात एकूण 11.52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपात करावी लागण्याची शक्यता होती, असे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले गेले. त्यानंतर पुण्यात 15 मेपर्यंत तरी पाणी कपात करायची नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना यांमुळे दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – समलिंगी विवाहाबद्दल संसद ठरवेल, तुम्ही सुनावणी घेऊ नका; केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात भूमिका

पुणे शहराला ज्या धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला ही चारही धरणं मिळून एकूण 11. 52 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरणामध्ये 1.07 टीएमसी, पानशेत धरणामध्ये 3.41 टीएमसी, वरसगाव धरणामध्ये 6.75 टीएमसी, टेमघर धरणामध्ये 0.28 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी कालवा समितीची बैठक बोलवली होती. या बैठकीत पाणीसाठा नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर पाणी कपात सध्या तरी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -