घरताज्या घडामोडी११ जवानांना वीरमरण आल्याचे समजून धक्का बसला; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

११ जवानांना वीरमरण आल्याचे समजून धक्का बसला; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ लष्करी जवान शहीद झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ११ जवानांना वीरमरण आल्याचं समजून धक्का बसल्याचे सांगत श्रद्धांजली वाहिली

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ लष्करी जवान शहीद झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ११ जवानांना वीरमरण आल्याचं समजून धक्का बसल्याचे सांगत श्रद्धांजली वाहिली. (11 jawans were shocked to learn that they had died heroically Tribute paid by Ajit Pawar)

नेमकं काय घडलं?

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी लष्करी जवानांवर हल्ला केला. हे जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) युनिटचे होते. शिवाय त्यांच्या वाहनाच्या चालकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अरणपूर-समेली दरम्यान हा हल्ला झाला.

अजित पवारांचे ट्वीट

- Advertisement -

‘छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूरच्या जंगलात नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ जवानांना वीरमरण आल्याचं समजून धक्का बसला. देशासाठी शहीद झालेल्या या जवानांचा, त्यांच्या कुटुंबियांचा त्याग सदैव स्मरणात राहील’, असे अजित पवार म्हणाले. तसेच, शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली!

याशिवाय, ‘शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. स्फोटात जखमी झालेल्या जवानांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करतो’, असेही अजित पवार म्हणाले.

IED हल्ल्यात 11 जवान शहीद

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या हल्ल्यावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले- दंतेवाडा येथे सुरक्षा जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात ११ जवान शहीद झाल्यामुळे आम्ही दु:खी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही.


हेही वाचा – “मला सोडा अशी विनवणी ती करत होती पण…” छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने खळबळ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -