घरमहाराष्ट्रदीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, सुदैवाने अनर्थ टळला

दीपप्रज्वलन करताना सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, सुदैवाने अनर्थ टळला

Subscribe

पुण्यातील एका कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. पुण्यातील एका कार्यक्रमावेळी सुप्रिया सुळे दीपप्रज्वलन करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घातल होत्या. यावेळी टेबलवर ओवाळनीच्या एका ताटात छोटा दिवा ठेवला होता. याच दिव्यावर सुप्रिया सुळे यांच्या साडीचा पदर आला आणि त्याने पेट घेतला.

हिंजवडीतील एका कराटे क्लासेसच्या उद्धाटनासाठी सुप्रिया सुळे प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळी सुप्रिया सुळे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला हार घालत असताना अचानक त्यांच्या साडीच्या पदराला आग लागली. यावेळी उपस्थितांपैकी एका व्यक्तीने त्यांची साडी जळत असल्याचे निदर्शानास आणून दिले. यानंतर तात्काळ साडीला लागलेली आग विझवण्यात आली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ होता होता टळला. यामुळे सुप्रिया सुळेंना कोणतीही इजा झाली नसून त्या सुखरुप आहेत.

- Advertisement -

या घटनेनंतर सुप्रिया सुळेंना त्याच साडीत कार्यक्रम पूर्ण करत उपस्थितांना संबोधितही केले. यानंतर त्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. यानंतर त्यांनी इतरांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मी सुखरुप आणि सुरक्षित आहे. कुणीही काळजी करू नका, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

सुप्रिया सुळे यांची घटनेवर प्रतिक्रिया

आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.


मातोश्रीच्या कोणत्या मजल्यावर काय पोहोचवलं, यादी लवकरच…; राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -